प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपाच्या प्रचाराचा धडाका; ‘रोड शो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
मिशन- PCMC : प्रभाग २ मध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचा संकल्प

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक–२०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ (कुदळवाडी–जाधववाडी–बोऱ्हाडेवाडी–मोशी) येथे भारतीय जनता पार्टीतर्फे भव्य पदयात्रा व रॅलीचे आयोजन करण्यात आले. हिंदुत्ववादी आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता ही पदयात्रा पार पडली.
वूड्सविले फेज टू, लक्ष्मी चौक येथून सुरू झालेली पदयात्रा स्वराज रेसिडेन्सी ते प्रेस्टिंग ग्रीन सोसायटी फेज १, २ व ३ मार्गे स्वदेशा सोसायटी, श्रीराम चौक आणि रिव्हर परिसरातून मार्गक्रमण करत पुढे सरकली. मोशी, बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी व चिखली परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी पाहायला मिळाला.
प्रचारादरम्यान प्रभागातील विकासकामांचा आढावा घेत “प्रभाग क्रमांक २ मध्ये आता फक्त कमळच” आणि “प्रभाग २ च्या प्रगतीला चारही मते भाजपला” अशा घोषणा देण्यात आल्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘बलशाली भारत आणि विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेनुसार शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

भाजपाकडून प्रभाग क्रमांक २ मध्ये सुजाता निलेश बोराटे (अ – ओबीसी महिला), सारिका नितीन बोऱ्हाडे (ब – सर्वसाधारण महिला), राहुल गुलाब जाधव (क – सर्वसाधारण) आणि निखिल शिवाजी बोऱ्हाडे (ड – सर्वसाधारण) हे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. समाविष्ट गावांचा सर्वांगीण विकास, पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच महिला व युवक सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याची भूमिका उमेदवारांनी मांडली.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे प्रचार कार्यक्रम वेग घेत असून प्रभाग क्रमांक २ मध्ये राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“प्रभाग क्रमांक २ मधील मोशी, बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी आणि चिखली परिसराचा सर्वांगीण, संतुलित आणि शाश्वत विकास हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत पारदर्शक व लोकाभिमुख कारभार केला जाईल. नागरिकांनी ‘चारही मते भाजपला’ देऊन संधी दिल्यास, प्रभाग क्रमांक २ मध्ये विकासाचा नवा अध्याय निश्चितपणे सुरू होईल,”
— राहुल जाधव, माजी महापौर व उमेदवार, भाजपा, प्रभाग क्रमांक २.





