अहिल्यादेवी सेवा संघातर्फे पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, नवी सांगवी, सांगवी परिसरातील भाजपा उमेदवारांना पाठिंबा
भाजपचे विकासाचे व्हिजन मान्य; अहिल्यादेवी सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांचा विश्वास

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 31 मधील भाजपच्या सर्व उमेदवारांना अहिल्यादेवी सेवा संघातर्फे जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला.
सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रभाग क्रमांक 29 मधील उमेदवार रवीना अंघोळकर, शकुंतला धराडे, शशिकांत कदम, शांताराम जगताप, प्रभाग क्रमांक 31 मधील दुर्गाकौर अदियाल, ज्ञानेश्वर जगताप, पल्लवी जगताप व नवनाथ जगताप आणि प्रभाग 32 मधील तृप्ती कांबळे, हर्षल ढोरे, उषाताई ढोरे, प्रशांत शितोळे या उमेदवारांनी प्रभागाच्या विकासाचा नारा दिला.यावेळी अहिल्यादेवी सेवा संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा – मोशीतील प्रियदर्शनीचा राष्ट्रीय स्तरावरील भारत प्रतिभा सन्मान
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून 2017 नंतर शहरांमध्ये विकासाची गंगा आली आहे. पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, नवी सांगवी, सांगवी या परिसरामध्ये भाजपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली. स्मार्ट सिटी अंतर्गत या भागाचा समावेश झाल्याने नागरिकांना अत्याधुनिक सेवा सुविधा मिळाल्या. आगामी काळात या भागातून निगडी ते चाकण पर्यंत जाणारी मेट्रो देखील येणार आहे. त्यामुळे भाजपाच्या माध्यमातून परिसराचा विकास होईल हा विश्वास आहे. म्हणूनच भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला असल्याचे अहिल्यादेवी सेवा संघाने स्पष्ट केले आहे.




