breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीचे लाईव्ह प्रेक्षेपण करा; विजय वडेट्टवार यांची मागणी

मुंबई : शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्याच्या इतिहासातील मोठ्या राजकीय बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण हे विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष सुनावणीकडे लागले आहे.

हेही वाचा – राज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा 

संवैधानिक संस्था, संवैधानिक पदे आणि एकंदरीत लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करावे. विधानसभा अध्यक्ष ही मागणी मान्य करून आपल्या पारदर्शक कारभाराचा परिचय देतील अशी आशाही त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button