breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

पुणे लोकसभेसंदर्भात वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

पुणे | लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. वसंत मोरे यांनी पुणे लोकसभा निवडणुक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

वसंत मोरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, कुठपर्यंत पोहोचला राम राम…गेली २१ वर्ष मी सातत्याने श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी दत्तगुरूंच्या दर्शनासाठी जात असतो नेहमीप्रमाणे आजही सकाळी मी नारायणपूरला गेलो आणि दर्शन झाल्यानंतर मी त्या ठिकाणी मंदिरा बाहेर बसणाऱ्या भिक्षुक लोकांना सातत्याने काही दक्षना देत असतो, त्यापैकी एका बाबांनी मला एक पेपरचे कात्रण दिल आणि मला बोलले मी तुमची आज वाटच बघत होतो ही घ्या तुमची बातमी म्हणजे वसंत मोरेचा राम राम कुठपर्यंत पोहोचलाय… याचा थोडा अभ्यास करा खासदार तर मीच होणार, असं ते म्हणाले.

हेही वाचा    –    ‘पवार कुटुंबात फूट पडलेली नाही, हे फक्त राजकारणासाठी’; शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांचं विधान 

वसंत मोरे यांनी काल रात्री उशिरा एक पोस्ट शेअर केली आहे. ‘तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच मी..’ अशी पोस्ट त्यांनी केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. याला ‘देखीये जी ये शहर है तुम्हारा लेकीन महोद्यजी आपके इस शहर में दबदबा है हमारा’ असं बॅकग्राउंड म्युझिक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button