breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

मनसे पुणे लोकसभा निवडणूक लढवणार? वसंत मोरे यांचं मोठं विधान

पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. लवकरच या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान, यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी पोटनिवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

वसंत मोरे म्हणाले की, मला पक्षाने आदेश दिला तर १०० टक्के निवडणूक लढवेल. केवळ लढवणार नाही तर पुणेकरांच्या जोरावर ही निवडणूक १०० टक्के मारेल सुद्धा. मला त्याची खात्री आहे. माझी पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. आता निवडणूक लागेल न लागेल काही सांगता येत नाही. परंतु आताची परिस्थिती पाहिली तर निवडणूक लागण्याची शक्यता अधिक आहे. निवडणूक लागली आणि राज ठाकरे यांनी आदेश दिले तर पुण्याची लोकसभा लढवेल.

हेही वाचा – ‘लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता नाही’; शरद पवार

पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा आहे. इच्छा का नसावी? माणसाने स्वप्न पाहिली पाहिजे. कोरोना काळात मी मोठं काम केलं. त्याची पावती म्हणून पुणेकर मला सहकार्य करतील. म्हणून आमच्या पक्षाला संधी मिळाली तर आरोग्य आणि वाहतूक या विषयावर लढू शकतो. राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली नाही. कारण निवडणूक तळ्यातमळ्यात आहे. पण निवडणूक जाहीर झाली तर राज ठाकरे यांच्याशी चर्चा करेन, असं वसंत मोरे म्हणाले.

२०१७ ची पुणे महापालिकेची निवडणूक पाहिली तर मनसेने मध्यमवर्गीय उमेदवारी दिले होते. कोणतंही मोठं कार्ड आमच्याकडे नव्हतं. पुण्यातील आमचं संपूर्ण मतदान ३ लाख ७९ हजार होतं. या ३ लाख ७९ हजार मतांचा ग्राफ पाहिला आणि आजची परिस्थिती पाहिली तर आम्ही जिंकू शकतो, असं मला वाटतं. गिरीश बापट यांना ६ लाख ३० हजार मतदान होतं. काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना ३ लाख १० हजार मते मिळाली होती. या सर्व घडामोडी पाहिलं तर आता तुल्यबल उमेदवार सहा आठ महिन्यासाठी निवडणूक लढवण्याची डेअरिंग करणार नाही. त्यात मतदान किती होईल याची शाश्वती नाही. म्हणून जर मनसे निवडणुकीत उतरली तर आम्ही चमत्कार घडवू शकतो, असा दावा वसंत मोरे यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button