breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

बिनशर्त पाठिंबा, तरीही राज ठाकरेंना शपथविधीला का बोलावलं नाही?मनसेच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं..

छत्रपती संभाजीनगर :  देशभरात लोकसभा निवडणुका नुसत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकीवेळी महाराष्ट्रात महायुतीला मनसेने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, निवडणुका पार पडल्यानंतर देशात एनडीएने सरकार स्थापन केलं. काल(रविवारी) शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला ६ हजारापेक्षा जास्त पाहुणे उपस्थित होते. या सोहळ्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे न दिसल्याने अनेकांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याबाबत बोलताना मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी शपथविधीसाठी आम्हाला आमंत्रण मिळाले असते तर आनंद झाला असता असं म्हटलं आहे.

मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीत आमचे कार्यकर्ते राबले. त्यामुळे दिल्लीतील एनडीए सरकारच्या शपथविधीसाठी आम्हाला आमंत्रण मिळालं असतं तर आम्हाला आनंद झाला असता, असं मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – पंतप्रधानपदावर विराजमान होताच मोदींची देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट; पहिल्याच दिवशी ‘या’ फाईलवर स्वाक्षरी

पुढे बोलताना ते म्हणाले, मनसे पक्ष हा एनडीएमधील घटकपक्ष नाही. त्यामुळे दिल्लीतील एनडीएच्या समन्वय बैठकीला आम्हाला बोलावणं अपेक्षित नव्हतं. मात्र, एनडीए सरकारच्या शपथविधीला मनसेला निमंत्रण देण्यात आले होते का, हे सांगणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कठीण आहे, अंसही ते पुढे म्हणालेत.

पुढे ते म्हणाले, शपथविधीला आम्हाला बोलावलं असतं तर आम्हाला आनंद झाला असता. आम्ही बिनशर्त पाठिंबा देऊन आमचे कार्यकर्ते महायुतीसाठी राबत होते. निमंत्रण आलं असतं तर कुठं दिसले असते, मोठं अपयश आल्याने महायुतीचे नेते आमंत्रण देण्यात विसरले असावेत. आपल्याच लोकांना आमंत्रण देण्यासाठी विसरतात. मैत्री जपणारी पिढी आता भाजपमध्ये संपलेली आहे. गरज असल्यावर उंबरठे झिजवायचे आणि काम झाल्यावर दार लावायचं. याचे परिणाम त्यांनी लोकसभा निवडणुकीत पाहिले आहेत. आमची त्यांच्यासोबत युती नव्हती, आमचा फक्त नरेंद्र मोदी यांना पाठिंबा होता, असंही त्यांनी म्हटलं आहे.

तर राज ठाकरेंच्या निमंत्रणावर बोलताना ते म्हणाले, राज ठाकरे यांना निमंत्रण होते की नाही, हे फक्त स्वतः राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सांगू शकतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button