Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात आमदारांना मनाई, का?

मुंबई | राज्यसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत शिवसेनेला पराभव पत्करावा लागल्याने शिवसेना सावध झाली आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा १५ जूनला अयोध्या दौरा असून, त्यातही शिवसेनेने बदल केला आहे. या दौऱ्यात आता केवळ शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी होणार असून, आमदारांना सोबत जाण्यास मनाई करण्यात आल्याचे समजते.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना; तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही अपक्ष आमदारांची मते भाजपच्या उमेदवाराला गेली. त्यामुळे यातून धडा घेऊन विधान परिषद निवडणुकीत असा कोणताही दगाफटक होऊ नये यासाठी शिवसेना तयारीला लागली आहे. आदित्य ठाकरे १५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या नियोजनासाठी; तसेच तिथे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी, आमदार मोठ्या संख्येने अयोध्येला जाणार होते. मात्र, २० जूनला विधान परिषद निवडणूक होणार आहे. त्यामुळे आमदार तिकडे असतील, तर नियोजनात अडचणी येणार आहेत. त्यामुळे आमदारांना अयोध्या दौऱ्याला जाण्यास मनाई करण्यात आली असून, सर्व आमदार मुंबईतच थांबणार आहेत.

दरम्यान, आदित्य यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी ठाणे रल्वे स्थानकातून विशेष एक्स्प्रेसने एक हजार २०० युवासैनिक अयोध्येकडे रवाना झाले आहेत. ढोल-ताशा आणि जय श्री रामच्या जयघोषात ते अयोध्येकडे निघाले आहेत. राज्यभरातूनही कार्यकर्ते अयोध्येला रवाना झाले आहेत. याशिवाय नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button