चिखली मोरे वस्तीमधील सोसायटीच्या सभासद नामफलकाचे अनावरण
![Unveiling of Society Member Nameplate in Chikhli More Vasti](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Untitled-design-67-780x470.png)
पिपरी: चिखली येथील मोरेवस्तीमधील टॉवर लाईन येथे अंबिका हौसिंग सोसायटी या सोसायटीच्या सभासद नामफलकाचे उदघाटन उत्साहात पार पडले. याप्रसंगी उद्योजक मनोज जरे यांच्या उपस्थितीत सोसायटीमधील महिलांनी नामफलकाचे पूजन करून अनावरण करण्यात आले. यावेळी परिसरातील महिलांचीदेखील उपस्थिती लक्षणीय होती. नामफलकामुळे या सोसायटीला ओळख मिळाली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Untitled-design-68-1024x576.png)
गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी सोसायटी स्थापन झालेली होती परंतु त्यास कोणत्याही प्रकारची ओळख दिलेली नव्हती. काही दिवसांपूर्वी येथील नागरिक व महिलांनी उद्योजक मनोज जरे यांना भेटुन सोसायटीचा सभासद नाम फलक बनवून देण्याची विनंती केली. त्या सर्वांच्या विनंतीवरून या ठिकाणी नाम फलक बनविण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे येथील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. या उदघाटनप्रसंगी सोसायटीमधील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.