शहीद तुकाराम ओंबळे यांच्या मुळगावच्या स्मारकाचा प्रश्न लवकारात लवकर मार्गी लागावा – शिवेंद्रसिंहराजे भोसले
![The issue of memorial of martyr Tukaram Ombale in Mulgaon should be resolved soon](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/रोहित-पवार-आणि-राम-शिंदे-4.jpg)
सातारा: २६ नोव्हेंबरला मुंबईवर हल्ला करून शेकडो लोकांचे प्राण घेणा-या शस्त्र सज्ज अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडताना हौतात्म्य आलेल्या तुकाराम ओंबळे यांचा पराकम आजही समस्त भारतीयांच्या हृदयात ठसून राहिला आहे. जावळीच्या या वीर सुपुत्राच्या केडंबे या मुळगावी उभारण्यात येणा-या भव्य स्मारकाचा प्रश्न लवकारात लवकर मार्गी लागावा असे केडंबे ग्रामस्थांना व समस्त जावलीकरांना वाटते. शहीद तुकाराम ओंबळे यांच्या नियोजित स्मारकासाठी १० कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्ण य यापुर्वीच्या बैठकीत झाला असतानाही ग्रामविकास मंत्री ना हसन मुश्रीफ यांच्या समवेत नुकत्याच झालेल्या बैठकीत स्मारकासाठी ५ कोटी रूपयांच्या निधीची मागणी करणे हे हस्यास्पद असून शहीद ओंबळे यांच्या अतुलनीय कामगिरीची अवहेलना करणारे आहे, असे मत आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी व्यक्त केले.
हुतात्मा ओंबळे यांच्या पराक्रमामुळे जावली तालुक्यातील केंडबे हे छोटेशे गाव देशात प्रसिध्द झाले शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पराक्रमाची दखल घेवून राज्य सरकारने त्यांच्या जन्मगावी केंडबे येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली. त्यांचे स्मारक झाल्यास केडवे गावचे महत्व वाढून ओंबळे यांचे स्मारक युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. स्मारक झाल्यास पर्यटन वृध्दीव्या दृष्टीने अश्वासक वातावरण निर्माण होवून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. यासाठी शहिद ओंबळे यांच्या भव्य स्मारकावरोवरच केंडबे गावास अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधां व गावाचा सर्वागिण विकास व्हावा यासाठी जास्तीजास्त निधी देण्याची मागणी आपण वेळोवेळी शासनाकडे केली आहे.
केंडबे गावातील स्मारकासाठीच्या जमिन हस्तांतरणाच्या कामात वास्तविक जिल्हा प्रशासनाने पुढे होत कागदपत्रांची पूर्तता करून स्मारकाचे कामास गती देणे गरजेचे होते. मात्र निव्वळ दप्तर दिरंगाईमुळेच स्मारकाचे काम गेली अनेक वर्षे रखडले स्मारकाच्या निधीसाठी शासन पातळीवर वेळोवेळी पाठपुरावाही केला असून यापूर्वी स्मारक निधी संदर्भात झालेल्या शासनाच्या बैठकीत शहीद ओंबळे यांच्या स्मारकासाठी व केंडबे गावच्या विकासाठी १० कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तथापी ग्रामविकास मंत्री ना हसन मुश्रीफ यांच्या समवेत मुंबई येथे नुकत्याच वैठकीत स्मारकासाठी ५ कोटी रूपयांची मागणी करणे ही एकप्रकारे अवहेलना करण्याचाच प्रकार असल्याचेही आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.