नाशिकमध्ये मध्यरात्री हत्येचा थरार; २४ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्रांनी सपासप वार
![Thrill of midnight murder in Nashik; A 24-year-old man was stabbed with a sharp weapon](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/नाशिकमध्ये-मध्यरात्री-हत्येचा-थरार-२४-वर्षीय-तरुणावर-धारदार-शस्त्रांनी-सपासप.jpg)
नाशिक : नाशिकमध्ये मध्यरात्री २४ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सावरकर चौक भागातील आकाश पेट्रोल पंपाशेजारी ही घटना घडली. यश रामचंद्र गांगुर्डे (रा. राजवाडा, म्हसरूळ) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हसरूळ भागातील दिंडोरी रस्त्यावर अज्ञातांनी यश गांगुर्डे याच्यावर मध्यरात्री चाकू आणि इतर धारदार शस्त्रांनी वार केले. पोटात वार करण्यात आल्याने यश गंभीर जखमी झाला होता. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला असून, हत्येचे कारण अस्पष्ट आहे.
दरम्यान, मध्यरात्री घडलेल्या या हत्या प्रकरणाने शहरात चांगलीच खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला आणि विहिरीत पडला, नातेवाईकांकडून हत्येचा आरोप