breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

एस.बी.पाटील आर्किटेक्चर महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

पिंपरी :- शिक्षकांचा उचित सन्मान करून पुढच्या पिढीने त्यांच्या आदर्श विचारांचे आचरण करावे असे प्रतिपादन आलाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे संचालक ज्येष्ठ वास्तुविशारद रंजीत गोगले यांनी केले.लिहिता वाचता न येणारे बालक ते देशाचा एक जबाबदार नागरिक घडविण्यापर्यंत शिक्षकांचे योगदान उल्लेखनीय आहे.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन (एसबीपीसीएडी) येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात गोगले बोलत होते.यावेळी सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्रियवंदा चितळे, एमएमआयइडीच्या प्राचार्य डॉ. शुभांगी शिरोळे, प्रा. प्रशांत जोशी, डीबाटू विद्यापीठाच्या हेमलता बुधवार, एसबीपीसीएडीचे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनावणे, प्रा. अजय हराळे, प्रशांत जोशी आदींसह आर्किटेक्चरचे विद्यार्थी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. महेंद्र सोनावणे यांनी स्वागत, प्रास्ताविक करताना  सांगितले की, या संस्थेत विद्यार्थी आणि शिक्षक यांचे मैत्रीचे नाते आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या नामवंत ज्येष्ठ वास्तुविशारद यांना या महाविद्यालयात मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात येते. सूत्र संचालन प्रा. तन्वी गणोरकर, प्रा. दिपीका कदम आणि आभार प्रा. श्रेयसी शिंदे यांनी मानले.

 

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button