तळेगाव दाभाडे येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी आलेला युवक बेपत्ता
प्रवेश अर्ज भरण्यासाठी सांगून घराबाहेर पडला

तळेगाव दाभाडे : नालासोपारा ठाणे येथील एकवीस वर्षीय मितेश संजय पोटे हा युवक बेपत्ता असून, घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो नुतन कॉलेज, तळेगाव दाभाडे येथे प्रवेश अर्ज भरण्यासाठी निघाल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. तो अद्याप परतला नाही.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार संजय हा ११ ऑगस्ट २०२५ रोजी घरातून निघून गेला. तो अद्याप परतलेला नाही. संजय हा नुतन कॉलेज, तळेगाव दाभाडे येथे प्रवेश अर्ज भरण्यासाठी निघाल्याचे सांगून बाहेर पडला होता.
त्याचा काहीही थांगपत्ता लागत नसल्यामुळे त्याचे कुटुंबीय चिंतेत आहे. आणि त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तो सध्या कुठल्याही लॉज, पीजी, हॉटेलमध्ये राहत असेल किंवा कोणत्या नातेवाईक, मित्रांकडे अथवा नोकरी करत असेल तर शिवाभाऊ पासलकर(९३२६४२५८५८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.