breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणे

SPPU: प्राध्यापकांच्या कॅसच्या मुलाखती पुन्हा रद्द; स्पुक्टोचा आंदोलनाचा इशारा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयामधील सहयोगी प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी कॅस (करिअर अ‍ॅडव्हान्समेंट स्कीम) अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या मुलाखती घेतल्या जातात. यावर्षी कोरोनामुळे मुलाखती दोन वेळा रद्द करण्यात आल्यामुळे प्राध्यापकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच येत्या 9 व 10 जानेवारीपूर्वी ‘कॅस’ चे कामकाज पूर्ण केले नाही तर विद्यापीठाच्या अधिसभेसमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा स्पुक्टो संघटनेने दिला आहे.

पुणे विद्यापीठातर्फे मार्च 2020 मध्ये संलग्न महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकांच्या कॅस च्या मुलाखती घेतल्या जाणार होत्या. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मुलाखती स्थगित करण्यात आल्या. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मुलाखती घेण्याचे नियोजन होते. मात्र, अंतिम वर्षाच्या परीक्षांचे काम आणि लॉकडाऊनमुळे प्रवासावरील येणा-या बंधनांमुळे त्या पुन्हा एकदा स्थगित केल्या. तसेच विद्यापीठाने नुकतेच परिपत्रक प्रसिध्द करून येत्या 22 ते 28 डिसेंबर या कालावधीत कॅस अंतर्गत 484 प्राध्यापकांच्या मुलाखती घेतल्या जातील, असे स्पष्ट केले होते. मात्र, पुन्हा एकदा विद्यापीठाने मुलाखती पुढे ढकलल्या. याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेतर्फे कुलगुरू नितीन करमळकर यांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button