तिरंगा रॅलीत भोसरीमध्ये विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
![भोसरीमध्ये तिरंगा रॅलीत विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/भोसरीमध्ये-तिरंगा-रॅलीत-विद्यार्थ्यांसह-नागरिकांचा-उत्स्फूर्त-प्रतिसाद.jpg)
पिंपरी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भोसरीतील प्रभाग क्र.७ मध्ये भव्य तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, संतोष लोंढे, माजी नगरसेविका सोनाली गव्हाणे, भीमाताई फुगे यांनी संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा हि मोहीम घरोघरी पोहचावी व राष्ट्रभावना वाढीस लागावी या उद्देशाने तिरंगा रॅली चे आयोजन केले होते.
या रॅलीला महात्मा फुले या विद्यालयातील १२०० विद्यार्थ्यांसह विश्वस्त, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व भोसरी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. भोसरी गावठाण मधील बापूजी बुवा चौक येथे ॲड. नितीन लांडगे, सोनाली गव्हाणे, भीमाताई फुगे आणि महात्मा फुले शाळेचे संचालक निळकंठ लोंढे यांनी भारतमातेचे पूजन करून या रॅलीची सुरुवात झाली. रॅली मध्ये ढोल, ताशे वाजवणारे विद्यार्थी तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि विविध राष्ट्रपूरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा सहभाग नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता.
ॲड. नितीन लांडगे, संतोष लोंढे, सोनाली गव्हाणे, भीमाताई फुगे यांनी गेल्या तीन दिवसांपासून घरोघरी तिरंगा वाटप केले होते. तसेच अन्य कोणी राहिले असतील तर त्यांच्यापर्यंत जनजागृती व्हावी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे. त्यानिमित्त या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅली मध्ये विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बापूजी बुवा चौकातून सुरू झालेली रॅली भोसरी गावठाण, पीएमटी चौक, छावा चौकातून आमदार महेश लांडगे यांच्या निवासस्थान मार्गे महात्मा फुले शाळेमध्ये या रॅलीचा समारोप करण्यात आला. पिंपरी चिंचवड मधील सर्वात मोठी तिरंगा रॅली म्हणता येईल इतकी मोठी आणि भव्य असं या रॅलीचं स्वरूप होत.
“तिरंगा हमारी शान है, तिरंगा हमारी जान है, जिस तिरंगे पे क्रन्तिकारी हुए कुर्बान, वो तिरंगा हमारी जान है”अशा घोषणांनी भोसरीचं वातावरण दुमदुमल होत. या भव्य तिरंगा रॅली मध्ये, माजी नगरसेविका शुभांगीताई लोंढे, किशोर गव्हाणे, शहर भाजपा सरचिटणीस विजय फुगे, योगेश लोंढे, अनिल लोंढे, विश्वनाथ लोंढे, भाऊसाहेब पाटील, सम्राट फुगे, पिंटू ढगे, दत्तात्रय गव्हाणे, निवृत्ती फुगे, ओंकार डावखरे आदी उपस्थित होते.