शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण

मुंबई : गेल्या 2-3 वर्षांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्याचे समोर आले आहे. अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याचे समोर आले आहे. आताही बरेच नेते पक्षांतराच्या तयारीत आहेत. अशातच आता शरद पवार गटाच्या एका खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. हा खासदार कोण आहे आणि त्याने पंतप्रधांनांची भेट का घेतली याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अमर काळेंनी घेतली मोदींची भेट
वर्धा लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघातीस विकास कामांबाबत अमर काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असल्याचे समोर आले आहे. अमर काळे यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.
हेही वाचा : महापालिकेच्या मोकळ्या आणि आरक्षित जागांमध्ये झुले व राईड्ससह मनोरंजनाची साधने लावण्यास बंदी..!
अमर काळेंची सोशल मीडिया पोस्ट
पंतप्रदान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर ट्वीट करत अमर काळे यांनी म्हटले की, ‘आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी वर्धा लोकसभा मतदारसंघ विकसित करण्याच्या व रोजगाराला चालना देण्याच्या दृष्टीने राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या ग्रामोद्योगाच्या विचारांवर आधारित देशातील एकमेव संस्था असलेल्या महात्मा गांधी ग्रामीण औघोगिकिकरण संस्था (MGIRI) च्या सर्वांगीण विकासाकरिता व संस्थेच्या विस्तारीकरणाकरिता लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली.’
अमर काळेंनी केला होता धक्कादायक दावा
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी ‘विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं भेटायला आली होती. त्यांच्याकडून 160 जागा जिंकून देण्याची गॅरेंटी देण्यात आली होती असं विधान केलं होतं. यावर बोलताना अमर काळे म्हणाले होते की, आमच्याकडे सुद्धा लोकसभा निवडणुकीआधी काही लोक आली होती. ते लोक की, आम्ही तुम्हाला निवडून आणतो, इतकी-इतकी रक्कम तुम्हाला द्यावी लागेल. दुनेश्वर पेठे यांच्याकडेही प्रस्ताव आला होता, की दोन कोटी रुपये तुम्ही द्या किती मतांनी तुम्ही निवडून याल हे आम्ही सांगतो आणि तेवढ्याच मतांनी तुम्ही निवडून याल अशी ऑफर मिळाल्याचे काळेंनी म्हटलं होतं.