भायखळा ते माटुंगा आणि पनवेल ते वाशी मार्गावर मध्य रेल्वेने शनिवारी-रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!
![Saturday-Sunday midnight megablock by Central Railway on Byculla to Matunga and Panvel to Vashi routes; Know the full schedule!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Saturday-Sunday-midnight-megablock-by-Central-Railway-on-Byculla-to-Matunga-and-Panvel-to-Vashi-routes-Know-the-full-schedule.jpg)
मुंबईः भायखळा ते माटुंगा आणि पनवेल ते वाशी मार्गावर मध्य रेल्वेने शनिवारी-रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घोषित केला आहे. सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान पश्चिम रेल्वेने ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ब्लॉक वेळेत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)
स्थानक – भायखळा ते माटुंगा
मार्ग – अप आणि डाऊन जलद
वेळ – रात्री ११.३० ते पहाटे ५.४० (शनिवार-रविवार मध्यरात्री )
परिणाम – ब्लॉक कालावधीत भायखळा ते माटुंगादरम्यान जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर धावणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या १० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे
स्थानक – पनवेल – वाशी
मार्ग – अप आणि डाऊन
वेळ – सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५
परिणाम – ब्लॉक वेळेत पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि पनवेल ते ठाणे अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहे. बेलापूर – खारकोपर आणि नेरुळ – खारकोपर, ठाणे – वाशी/नेरुळ या मार्गावर लोकल फेऱ्या सुरू राहणार आहेत.
पश्चिम रेल्वे
स्थानक – सांताक्रूझ ते गोरेगाव
मार्ग – अप आणि डाऊन जलद
वेळ – सकाळी १० ते दुपारी ३
परिणाम – ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर धावणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या १० मिनिटे विलंबाने धावणार आहेत
ब्लॉकमुळे रेल्वेगाड्यांवर परिणाम
गाडी क्रमांक ११०५८ अमृतसर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, ११०२० कोणार्क एक्स्प्रेस आणि १२८१० हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. या गाडीला दादर, प्लॅटफॉर्म क्रमांक ३ येथे दुहेरी थांबा दिला जाईल आणि गंतव्यस्थानी १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचेल.