G-20 शिखर परिषदेची तयारी : पुण्यातील ७७ ठिकाणांची साफसफाई, ३५ टन कचरा गोळा
![Preparation for G-20 Summit: Cleanliness of 77 places in Pune, 35 tons of garbage collected](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/g20.jpg)
पुणे : जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे शहरात ७७ ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याअंतर्गत 27 हजार 819 किलो सुका कचरा, 3 हजार 724 किलो ओला कचरा, 4 हजार किलो राडारोडा असा एकूण 35 हजार 543 किलो (35 टन) कचरा संकलित करण्यात आला. रविवारी पुणे महापालिकेच्या वतीने लोकसहभागातून स्वच्छतेसाठी ही मोहीम राबविण्यात आली. शहरातील सर्व पंधरा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शहरातील सार्वजनिक रस्ते, वस्ती, ऐतिहासिक स्थळे, पर्यटन स्थळे अशा विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
पुढील आठवड्यात शहरात जी-20 शिखर परिषद सुरू होणार आहे. यामध्ये विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहराला स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्याचा संदेश जगभर पोहोचविण्यासाठी महापालिका प्रशासनाने स्वच्छतेवर भर दिला आहे. या संदर्भात पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने रविवारी सकाळी सात ते नऊ या वेळेत स्वच्छता मोहीम राबवली. शनिवारवाड्याच्या प्रांगणात मोहीम राबविण्यात आली. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, विविध विभागांचे प्रमुख व इतर वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी व पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहिमेचा दृष्टीकोन
- शनिवारवाडा परिसर आणि अंतर्गत परिसरात नागरिक, विद्यार्थी, युवकांनी सहभाग घेत स्वच्छता मोहीम राबवली.
- महापालिकेच्या 15 झोन कार्यालयांच्या हद्दीत शहरातील विविध भागात 150 हून अधिक ठिकाणी ही स्वच्छता मोहीम
प्रमुख ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांसह, पर्यटन स्थळे, सार्वजनिक उद्याने, प्रमुख चौकांसह - विविध स्वयंसेवी संस्था आणि संघटनांसह महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांचा सहभाग