Petrol Diesel Price Hike: देशात पेट्रोल-डिझेलची दरवाढ; मुंबईत पेट्रोल नव्वदी पार
![Petrol diesel price hike today Mumbai petrol price cross 90 rupees](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/OMCs-hike-petrol-diesel-prices-for-tenth-consecutive-day.jpeg)
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले होते. पण आता पुन्हा दरवाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर पुन्हा एकदा 90 रुपयांच्या पार गेले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनं मागील 25 महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये पेट्रोलचे दर, नव्वदीपार गेले आहेत. आज सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 20 पैशांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. बुधवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 84.45 रुपये झाली आहे. तर डिझेलची किंमत प्रतिलिटर 74.63 रुपये झाली आहे. तसेच मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 91.07 रुपयांवर गेली आहे. तर डिझेलची किंमत 81.34 रुपये प्रतिलिटर झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलांच्या किंमती वाढल्यामुळं आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत ही वाढ झाल्याची बाब निदर्शनास येत आहे. या दरांमध्ये राज्य सरकारकडून आकारला जाणारा करही समाविष्ट असतो. क्रूड ऑईल प्रति बॅरल 53.50 डॉलर वर पोहोचला आहे. तर ब्रेंट क्रूड ऑईल प्रति बॅरल 56.58 डॉलर प्रति बॅरलवर असल्याचं पाहायला मिळालं. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती तुम्हाला एसएमएसद्वारे मिळवता येऊ शकते. इंडियन ऑईलच्या संकेतस्थळानुसार तुम्हाला RSP आणि तुमच्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा.