TOP NewsUncategorizedटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

बीआरटी मार्गातून येणाऱ्या २०० वाहनांवर दंडात्मक कारवाई; सांगवी वाहतूक पोलीसांची मोठी कारवाई : १५ दिवसांत विशेष मोहिमेत १३ लाख ८७ हजारांचा दंड वसूल

पिंपरी-चिंचवड : सांगवी वाहतूक पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत पंधरा दिवसांत १३ लाख ८७ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच रक्षक चौक ते पिंपळे सौदागर बीआरटी लेन येथे आज पोलिसांनी कारवाई करत २०० वाहनांवर केसेस व दंड वसूल केला. या विशेष मोहिमेत पोलिसांनी बीआरटीएसमधून येणारी वाहने, पीटीपी नाकाबंदी, नो एन्ट्री, काळ्या काचेच्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या १ ते १४ फेब्रुवारी पंधरा दिवसात बीआरटीएस मार्गामधून येणाऱ्या ९५० खासगी वाहनांवर कारवाई करत ६ लाख ३६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

नो एन्ट्रीमध्ये येणाऱ्या वाहनांवर ७७ केसेस करत ६ लाख ८ हजार ६०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. काळी काच म्हणजे ब्लॅक फिल्म लावलेल्या १४० वाहनांवर कारवाई करत १ लाख ४९ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. तर पीटीपी नाकाबंदी दरम्यान १ हजार ९३१ वाहनांवर कारवाई करत १३ लाख ८७ हजार ७५० रुपयांचा दंड आकारण्यात आला. दरम्यान आज बीआरटीएस मधून येणाऱ्या २०० खासगी वाहनांवर कारवाई करत १ लाख ३९ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. पीटीपी नाकाबंदीमध्ये ६४ वाहनांवर अनपेड दंड आकारत ४० हजार १०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई या पुढेही अशीच सुरु राहील असे सांगवी वाहतूक विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button