Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

…अन्यथा डोंगर कोसळून आमचे माळीण होईल?, पेढेतील ग्रामस्थांचा जीव मुठीत

चिपळूण : परशुराम घाटात डोंगरावरील बाजूने संरक्षक भिंती नसल्यामुळे डोंगर कोसळून मोठी दुर्घटना होण्याची भीती त्याला लागून असलेल्या पेढे गावातील गावकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवावी, अशी मागणी पेढे ग्रामपंचायतीकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. सोमवारी हे निवेदन देण्यात आले. यात मोठी भीती व्यक्त करण्यात आली आहे. अन्यथा आमच्या गावचे माळीण होईल, असेच त्यांना निवेदनातून सुचवायाचे आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून परशुराम घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

संरक्षक भिंती उभारण्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता

डोंगराच्यावरील बाजूने संरक्षक भिंत आणि हायवेच्या खालच्या बाजूने संरक्षक भिंतीची वारंवार मागणी आणि विनवणी करूनही त्याकडे लक्षच देण्यात आलेले नाही. त्यामुळेच आज ही परिस्थिती ओढवली आहे, असा गंभीर आरोप निवेदनात शासन प्रशासनावर करण्यात आला आहे. या मार्गावरून प्रवास करताना परशुराम घाट चालू झाल्यावर प्रवाशांच्या पोटात अक्षरशः भीतीचा गोळा येतो. कधी काय होईल? याचा भरवसा नाही. रात्रीच्या वेळी या घाटात भयानक, असे वातावरण असते. रात्रीचा प्रवास करताना अचानक डोंगर खचल्यास प्रवासी आपला जीव कसा वाचवणार? हा मोठा प्रश्न आहे. म्हणूनच कोणतीही दुर्घटना होऊ नये वाहने. दरडी खाली येऊ नयेत आणि जीवित हानी होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून परशुराम घाट अतिवृष्टीवेळी पूर्णपणे बंद ठेवण्यात यावा. इतर वेळी रात्री ९.०० ते सकाळी ६.०० पर्यत वाहतुकीस बंद ठेवण्यात यावा. अवजड वाहनांना या मार्गाने ये-जा करण्यास बंदी करावी आणि वाहतूक आंबडस-चिरणी मार्गे लोटे, अशी चालू ठेवावी या मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, आशा काही मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

ग्रामस्थ प्रचंड भितीच्या तणावाखाली

परशुराम घाटात दोन जुलैला शनिवारी रात्री उशिरा दरड कोसळली आणि वाहतूक बंद झाली. यापूर्वी अनेकदा परशुराम घाटातील दरड कोसळली. त्याबरोबर मोठ मोठे दगडही कोसळले. परंतु रस्त्यालगत मोठे खड्डे असल्याने त्या खड्ड्यामध्ये ते अडकून राहिले. आता रस्त्यालगतचे खड्डे भरलेले आहेत. यापुढेवरून येणारी माती, दगड हे रस्त्यावर येण्याची दाट शक्यता आहे. सततच्या दरड कोसळण्याच्या प्रकारामुळे पेढे परशुराम ग्रामस्थ भयभीत झालेले आहे. दरड कोसळण्याच्या आवाजामुळे ते दचकून उठतात आणि इतर ग्रामस्थांशी फोन वरून संवाद साधतात वारंवार कोसळत असलेल्या दरडीमुळे घाबरून पेढे परशुराम ग्रामस्थांची झोप हि उडाली आहे अशी व्यथा या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

पर्यायी वाहतूक व्यवस्था करत असताना पेढे परशुराम येथील रहिवाशांचा प्रामुख्याने विचार करणे आवश्यक आहे. येथील रहिवाशी नोकरी धंद्यानिमित्त लोटे, खेड, चिपळूण येथे जातात. मुले शाळा कॉलेजमध्ये जातात. त्यांच्यासाठी पर्यायी वाहन व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण परशुरामच्या रहिवाशांना लोटे चिरणी आंबडस मार्गे चिपळूणला यावे लागणार आहे. आणि पेढेतील रहिवाशांना आंबडस चिरणी मार्गे लोटे येथे जावे लागणार आहे.

आता कुठे पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाचे पाणी जमिनीत जिरले असून झरे चालू झालेले आहेत. डोंगरावरील बाजूने संरक्षक भिंती नसल्यामुळे डोंगर कोसळून मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून संभाव्य धोका लक्षात घेऊन परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद ठेवावा, अशी विनंती चिपळूण तहसीलदार, उपविभागीय अधिकारी चिपळूण तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी चिपळूण यांना हे निवेदन पाठवण्यात आले आहे. या सगळ्याकडे प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button