breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व समरसता मंचाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मानवंदना

पिंपरी: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व समरसता मंचाच्या वतीने पिंपरी चिंचवड निगडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंती निमित्ताने मानवंदना देण्यात आली. त्याप्रसंगी  अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ माजी अध्यक्ष, अमित गोरखे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी डॉ. रमेश पांडव अखिल भारतीय समरसता  संयोजक विनोदजी बन्सल, जिल्हा संघचालक नरेशजी गुप्ता, देहूरोड संघचालक हेमंत हरहरे, प्रांत कार्यकारणी सदस्य माहेश्वरजी मराठे, जिल्हा कार्यवाह महेंद्र बोरकर, समरसता जिल्हा संयोजक अनिल सौंदडे, समरसता गट संयोजक रवी पाटील, गट संयोजक प्रदीप पवार, बौद्ध जन विकास समिती प्रमुख केसरबाई लांडगे, माजी नगरसेविका अनुराधाताई गोरखे, राजन लाखे, सविता गायकवाड, धनंजय भिसे, मनोज तोरडमल आणि असारामजी कसबे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रसंगी बोलताना रमेशजी पांडव म्हणाले, अण्णाभाऊंची आज जयंती असून आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. अण्णाभाऊंनी आपल्यासाठी अभ्यास केला, राबले, जीवन समर्पित केले. त्याचाच परिणाम आज दिसून येत असून आपण अभिनंदनाच्या आघाडीवर आहोत. आपले आपल्या अण्णाभाऊंचे साहित्य अफाट आहे. तसेच सेवावस्त्यांमध्ये जाऊन एक नवी पध्दत शोधून नववीच्या विद्यार्थ्यांने आठवीच्या विद्यार्थ्यांला व आठवीच्या विद्यार्थाने सातवीच्या विद्यार्थ्याला शिकवावे, तो जास्त चांगल्या पद्धतीने शिकवू शकतो कारण तो नुकताच सातवीच्या वर्गातून आठवीच्या वर्गात गेला असतो. ही पध्दत राबविल्यास शहरातील एकही सेवा वस्ती अशिक्षित राहणार नाही. अण्णाभाऊंना रशियात जाण्याची संधी मिळाली होती, आपणही इच्छाशक्ती ठेवल्यास विविध देशात आपल्याला ही जाण्याची संधी  मिळू शकते, अश्या शब्दात आपल्या भावना व्यक्त करून अण्णाभाऊंना मानवंदना दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button