महापालिका शाळेत आधुनिक सोयी-सुविधांची जोड अन् आदर्श शाळा पुरस्कार!
मिशन- PCMC : पिंपळे निलख प्रभागात तुषार कामठे यांच्या कामाचा ठसा

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 26, पिंपळे निलख-विशालनगर येथील महापालिका शाळा आता आधुनिक शिक्षणाचे केंद्र बनली आहे. शाळेच्या नव्या रूपांतरामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते, तसेच शाळा संपूर्ण परिसरात प्रेरणास्थान ठरली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी 2017 मध्ये निवडून येताच शाळेच्या सुधारणा आणि नूतनीकरणावर विशेष लक्ष दिले. त्यांच्या पुढाकारामुळे शाळेत ई-लर्निंग सुविधा, संगणक लॅब, सुरक्षित खेळाचे मैदान, आधुनिक वर्ग, तसेच सेमी इंग्लिश मिडीयम सुरु करण्यात आले. यामुळे विद्यार्थीसंख्या हजारावर पोहोचली असून, शिक्षणाच्या कक्षा मोठ्या प्रमाणात रुंदवल्या गेल्या आहेत.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी एकत्र; महायुती आणि मविआचा फॉर्म्युला अद्याप अनिश्चित
महानगरपालिका शाळांबाबत असलेला “चांगल्या सुविधा नसतात” हा समज पिंपळे निलख शाळेने पुसून टाकला आहे. शाळेला यशस्वी सुधारणा आणि आधुनिक सुविधांमुळे आदर्श शाळा म्हणून प्रथम पारितोषिकही मिळाले आहे.
शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी शाळेच्या या बदलाबाबत सांगितले की, “शिक्षण हे फक्त पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसावे. प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे, त्याच्या कुवतीनुसार संधी उपलब्ध व्हाव्यात, आणि शाळा ही केवळ शिक्षणाचे केंद्र नसून प्रेरणेचे ठिकाण बने, हेच माझे ध्येय आहे. पिंपळे निलख शाळेचे हे रूपांतर त्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.” तुषार कामठे यांच्या नेतृत्वाखाली पिंपळे निलख शाळेचे हे रूपांतर संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेरणास्थान ठरले आहे. आधुनिक सुविधांमुळे शाळा ही शिक्षणाचे आदर्श केंद्र म्हणून ओळखली जात आहे.

शिक्षण हे फक्त पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसावे. प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे, त्याच्या कुवतीनुसार संधी उपलब्ध व्हाव्यात, आणि शाळा ही केवळ शिक्षणाचे केंद्र नसून प्रेरणेचे ठिकाण बने, हेच माझे ध्येय आहे. पिंपळे निलख शाळेचे हे रूपांतर त्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.
– तुषार कामठे, शहराध्यक्ष, उमेदवार, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष.



