Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी एकत्र; महायुती आणि मविआचा फॉर्म्युला अद्याप अनिश्चित

मिशन-PCMC : भाजपा-सेना-आरपीआय महायुतीबाबत आज घोषणा होण्याची शक्यता

पिंपरी-चिंचवड | अखेर पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र आले आहेत. याची घोषणा अजित पवारांनी केली. या घडामोडीमुळे राष्ट्रवादी कुटुंब पुन्हा एकत्र येत असल्याचे स्पष्ट झाले, मात्र याचे परिणाम महायुती आणि महाविकास आघाडीवर लगेच उमटणार आहेत.

विशेष म्हणजे, मविआसाठी हा मोठा झटका ठरला आहे. शनिवारपर्यंत शरद पवारांचा गट राष्ट्रवादीचा भाग होता. रविवारी त्यांचा जागा-वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होणार होता, पण अजित पवारांनी अचानक घोषणा करत मविआला मोठा धक्का दिला. यामुळे मविआचा प्लॅन ‘ए’ फोल ठरला असून आता मविआ प्लॅन ‘बी’ अंतर्गत शरद पवार गट वगळून इतर घटक पक्षांच्या आघाडीने लढणार आहे.

महायुतीमध्ये देखील बदल दिसून येत आहेत. अजित पवारांच्या घोषणेनंतर भाजप, शिंदे शिवसेना आणि आठवलेंची आरपीआय युती तयार करण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. परिणामी, पिंपरी-चिंचवडमध्ये ‘दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-शिंदे सेना युती विरुद्ध मविआ’ अशी तिरंगी लढत होणार आहे.

हेही वाचा      :              इंद्रायणीनगर- भोसरी प्रभाग- ८ मध्ये “मॉर्निंग वॉक वुईथ डॉ. सुहास” मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

जागावाटपाचे अंदाजे आकडे:

128 जागांपैकी अजित पवार गटाला 110 आणि शरद पवार गटाला 18 जागा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. फार तर शरद पवारांच्या गटाला आणखी 2-4 जागा मिळू शकतात. रणनीतीनुसार, ज्या प्रभागात घड्याळ चिन्हाचे तीन आणि तुतारीचे एक उमेदवार असेल, तिथे चारही उमेदवार घड्याळावर लढतील. तसेच जिथे तीन तुतारी आणि एक घड्याळ असेल, तिथे चारही उमेदवार तुतारीवर लढतील.

मविआचा पूर्वीचा प्लॅन ‘ए’:

पुर्वी मविआने काँग्रेसला 30, ठाकरे सेनेला 35, मनसेला 18, इतर समविचारी पक्षांना 10 आणि शरद पवार गटाला 35 जागा देण्याचे ठरवले होते. आता प्लॅन ‘बी’ अंतर्गत शरद पवार गटाच्या 35 जागांची विभागणी करण्यात येत आहे.

महायुतीचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही:

भाजप शिंदे शिवसेनेला 128 पैकी 14 जागा देण्यास तयार आहे, तर आरपीआयला 3 ते 5 जागा देण्याची तयारी आहे. आरपीआयचे सर्व उमेदवार कमळावर लढणार आहेत. मात्र शिंदे शिवसेनेने काही जागांसाठी विरोध दर्शविल्यामुळे युतीची अंतिम घोषणा अद्याप झाली नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button