breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सावित्रीबाई फुले विद्यापीठात सायकलींना प्रवेश देण्यासाठी ‘इंडो ॲथलेटिक्स’चे आंदोलन

पिंपरी : सावित्रीबाई फुले विद्यापीठाने घेतलेल्या सायकल निर्णयाविरोधात आज इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या सदस्यातर्फे विद्यापीठाच्या आवारामध्ये सायकल प्रवेश द्यावा, यासाठी आंदोलन करण्यात आले.

इंडो ॲथलेटिक्स संस्थेचे सदस्य गजानन खैरे म्हणाले, इतर सर्व वाहनांना विद्यापीठात मुक्तपणे प्रवेश दिला जात आहे. परंतु, सायकलस्वारांना बंदी घातली आहे. विद्यापीठामध्ये वातावरण चांगले असल्यामुळे बरेच जण सायकलवर सकाळी व्यायाम करण्यासाठी येतात. दिवसभर विद्यापीठांमध्ये वाहनांची वर्दळ असते. परंतु, सायकलला बंदी घातली आहे. हे आश्चर्यजनक आहे.

उमा डोंगरे म्हणाल्या, विविध कंपन्यांमध्ये त्याचप्रमाणे देशातील विविध आयआयटी व आयआयएमच्या कॅम्पसमध्ये फक्त सायकलला प्रवेश आहे. इतर वाहनांना बंदी आहे. या निर्णयामुळे सायकल संघटनांमध्ये संतापाची लाट आहे. अजित पाटील म्हणाले, एकेकाळी पुणे हे सायकलींचे शहर होते. परंतु, विद्येचे माहेरघर असलेल्या विद्यापीठाकडून अशा निर्णयाची अपेक्षा नाही.

विद्यापीठांमध्येदेखील सायकल ट्रॅक्स झाले पाहिजेत. लवकरात लवकर सायकलविरोधी निर्णय मागे घ्यावा, सायकलस्वारांवर घातलेली बंदी उठवावी, असे निवेदन कुलगुरूंना देण्यात आले. आंदोलनात गिरिराज उमरीकर, श्रेयस पाटील, गिरीश परदेशी, सुनील चाको, रमेश माने, बाळासाहेब कांबळे, अजित गोरे, संदीप परदेशी, अमीर शेख, अमीन शेख, उमा डोंगरे, सुरेश माने, सुहास पवार, युवराज पाटील आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button