breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणेमराठवाडामहाराष्ट्रराजकारण

‘पक्ष सोडून जाताना सर्वांना…’ बॅनरवरून आमदार रत्नाकर गुट्टे स्पष्टच बोलले…

परभणी । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

राज्यातील राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे ( Ratnakar Gutte ) यांनी गंगाखेड शहरांमध्ये लावलेल्या बॅनरवरून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांचा फोटो गायब झाल्याचे दिसून आले. यानंतर माध्यमांधून या संदर्भातील वृत्त झळकल्यानंतर याची दखल आमदार गुट्टे यांनी घेतली आहे. या प्रकरणी आमदार गुट्टे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठानच्या वतीने लावण्यात आलेल्या बॅनरवर फोटो लावला नसेल, पण महादेव जानकर माझे नेते आहेत आणि मी पक्षासोबतच आहे, असे स्पष्टीकरण गुट्टे यांनी दिले आहे. पक्ष सोडून जाताना सर्वांना सांगून जाईल, असेही गुट्टे म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस यांच्या उपस्थितीमध्ये गंगाखेड शहरामध्ये आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांगांना साहित्य वाटप सोहळा आणि गौरी गणपती सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन उद्या गुरुवारी १५ सप्टेंबरला करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

याच कार्यक्रमाच्या निमित्ताने गंगाखेड शहरामध्ये आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वतीने विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांचा फोटो गायब झाल्याने माध्यमांनी वृत्त दिले होते. या वृत्ताची दखल आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी घेतली आहे. कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरवर एखाद्या वेळेस माझे नेते महादेव जानकर यांचा फोटो चुकून राहिला असेल. ते माझे नेते असून मी पक्षासोबतच आहे, असे स्पष्टीकरण गुट्टे यांनी दिले आहे. तर गंगाखेड शहरात लावलेल्या इतर बॅनरवर फोटो असल्याचे देखील गुट्टे यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button