मध्य रेल्वेवर शनिवारी रात्री मेगाब्लॉक; येथे वाचा लोकलचे संपूर्ण वेळापत्रक
![Megablock on Saturday night on Central Railway; Read the full local schedule here](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Megablock-on-Saturday-night-on-Central-Railway-Read-the-full-local-schedule-here.jpg)
मुंबईः पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर रविवारी मध्य रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. आज, शनिवारी मध्यरात्री भायखळा ते माटुंगा दरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर वाणगाव ते डहाणू रोड दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असल्याने १४ रेल्वे गाड्या पूर्णत: रद्द आणि २० मेल एक्स्प्रेस अंशतः रद्द करण्यात येणार आहेत. प्रवाशाच्या सुविधेसाठी पाच रेल्वे गाड्यांना वाणगाव आणि डहाणू रोड स्थानकात अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे.
मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)
स्थानक : भायखळा ते माटुंगा
मार्ग : अप आणि डाऊन जलद
वेळ : शनिवार रात्री ११.३० ते रविवार पहाटे ५.४०
परिणाम : ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे लोकल १५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे
स्थानक : पनवेल ते वाशी
मार्ग : अप आणि डाऊन
वेळ : रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५
परिणाम : ब्लॉक कालावधीत पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप-डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. पनवेल-ठाणे अप-डाऊन लोकल फेऱ्या देखील रद्द राहणार आहेत. खारकोपर आणि बेलापूर/नेरुळ दरम्यानच्या आणि ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लोकल सुरू राहणार आहेत. सीएसएमटी-वाशी मार्गावर विशेष लोकल फेऱ्या धावतील.
पश्चिम रेल्वे
स्थानक : वाणगाव ते डहाणू रोड
मार्ग : अप आणि डाऊन
वेळ : अप मार्ग सकाळी ७ ते दुपारी ३ आणि डाऊन मार्ग दुपारी १२.३० ते दुपारी १.२०
परिणाम : ब्लॉक कालावधीत १४ रेल्वे गाड्या पूर्णत: रद्द आणि २० मेल एक्सप्रेस अंशतः रद्द करण्यात येणार आहे.
शनिवारचा रात्रकालीन ब्लॉक
स्थानक : गोरेगाव ते सांताक्रूझ
मार्ग : अप आणि डाऊन जलद
वेळ : रात्री १२ ते पहाटे ४.३०
परिणाम : ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत.