नाशिकमध्ये कबीरनगर झोपडपट्टीत भीषण आग, चार सिलिंडर्सचे स्फोट; तीन गंभीर जखमी
![Massive fire, four cylinders explode in Kabirnagar slum in Nashik; Three seriously injured](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Massive-fire-four-cylinders-explode-in-Kabirnagar-slum-in-Nashik-Three-seriously-injured.jpg)
नाशिक : नाशिक शहरातील द्वारका परिसरात कबीरनगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. या घटनेत आतापर्यंत चार सिलिंडर्सचा स्फोट झाल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या सर्व केंद्रांना अलर्ट देण्यात आला आहे. अग्निशमन दलाचे १० बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. यासोबत १०८ क्रमांकाच्या दोन रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
नाशिकच्या द्वारका येथील आगीत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भीषण आगीमुळे आजूबाजूचे रहिवासी हे घरातील सिलिंडर घेऊन रस्त्यालागत बसले आहेत. आगीमुळे नागरिकांची धावाधाव सुरू आहे. खबरदारी म्हणून सारडा सर्कल, वडाळा नाका, द्वारकाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत.
नाशिकमधील या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीत घरांचं मोठं नुकसान झालं आहे. दाटीवाटीच्या परिसर असल्यानं अग्निशमन दलाला अचणी येत आहेत. आग पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. पोलिसांना कसरत करावी लागतेय. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.