‘कोविशिल्ड’चा साठा संपला! शहरात गुरुवारी 11 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’ची लस मिळणार
![Kovishield stocks up! The vaccine will be available at 11 centers in the city on Thursday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Bharat-Biotech-covaxin-e1608172714127.jpg)
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेला ‘कोविशिल्ड’ लशीचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे उद्या (गुरुवारी) फक्त ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. 18 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’ची लस दिली जाणार आहे. किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या आणि ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.
‘या’ 11 केंद्रांवर मिळणार लस!
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, पिंपळेनिलख इंगोले शाळा, नवीन भोसरी रुग्णालय, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, यमुनानगर रुग्णालय, जुने जिजामाता रुग्णालय आणि निळु फुले नाट्यगृह पिंपळेगुरव या केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस मिळणार आहे.
सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण होणार आहे. पहिला डोस घेऊन 28 दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. कोविन अॅपवर नोंदणीकरिता सकाळी 8 नंतर स्लॉट बुकिंगसाठी ओपन करण्यात येणार आहेत. ‘कोविशिल्ड’ लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने उद्या ‘कोविशिल्ड’ची लस मिळणार नाही.