भारताची स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाचा उपक्रम कौतुकास्पद
ज्वाला गुट्टाकडून 30 लीटर ब्रेस्ट मिल्क दान

मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने एक उपक्रम सुरु केलाय. हा उपक्रम खरच कौतुकास्पद आहे. नुकतीच आई बनलेली ज्वाला गुट्टा दररोज 600 मिलीलीटर दूध सरकारी रुग्णालयांमध्ये दान करत आहे. बॅडमिंटन कोर्टवर देशासाठी अनेक मेडल जिंकणारी ज्वाला आता लहान निरागस बाळांचे प्राण वाचवत आहे. ज्या नवजात बालकांना आई नाहीय, ज्वाला त्या बाळांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. रिपोर्टसनुसार, तिने आतपापर्यंत 30 लीटर ब्रेस्ट मिल्क दान केलय. मागच्या चार महिन्यांपासून ज्वाला गुट्ट दररोज निरागस बाळांसाठी बरच काही करत आहे.
ज्वाला गुट्टा नुकतीच आई बनलीय. 22 एप्रिल 2021 रोजी तिचं लग्न अभिनेता विष्णू विनोदसोबत झालं. चार वर्षानंतर ती आई बनली. ज्वाला आपल्या मुलीला दूध पाजल्यानंतर सर्व दूध दान करते. भारतात पहिल्यांदा कुठल्यातरी एथलीटने असं पाऊल उचललं आहे. हे खरच प्रेरणादायक आहे. आईच दूध बाळासाठी अमृतासमान असतं. आईच्या दूधात बाळाच्या विकासासाठी सर्व पोषकतत्व असतात.यामुळे बाळांचा एलर्जी, अस्थमा आणि लठ्ठपणाचा धोका कमी होतो.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
ज्वाला गुट्टाने आपल्या करिअरमध्ये बरच काही मिळवलय. तिने 2010 आणि 2014 साली भारतासाठी कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. बॅडमिंटनच्या महिला दुहेरीत भारताची ओळख बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अश्विनी पोनप्पासोबत मिळून अनेक सामने जिंकले. पोनप्पा सोबत तिची जोडी टॉप 10 रँकमध्ये होती. गुट्टाने श्रुति कुरियन सोबत मिळून अनेकदा नॅशनल चॅम्पियन बनण्याचा गौरव प्राप्त केला आहे. इतकच नाही, वर्ष 2011 मध्ये तिने BWF विश्व चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं. 2014 साली ज्वालाने थॉमस आणि उबेर कपमध्ये कांस्य पदक जिंकलं.