breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘ मी नवीन प्लेअर…जरा दमानं घ्या’; विरोधकांच्या आक्रमक हल्ल्याने सरकारमधील आणखी एक मंत्री घायाळ

मुंबई । महान्यूज । विशेष प्रतिनिधी । 

राज्यातील सत्तांतरानंतर मंत्रिमंडळ विस्तार रखडला आणि थेट पावसाळी अधिवेशनाच्या काही दिवस आधी नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामुळे आपल्या खात्याची सखोल माहिती घेण्यास या मंत्र्यांना वेळ मिळाला नाही. परिणामी आता सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत असलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना नवनिर्वाचित मंत्र्यांची चांगलीच दमछाक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप नेते आणि राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याबाबतही सभागृहात आज काहीसा असाच प्रकार घडला.

प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना अपुऱ्या माहितीमुळे मंगलप्रभात लोढा यांची अडचण झाली. त्यामुळे बुचकळ्यात पडलेल्या लोढा यांनी थेट विरोधकांसह विधानपरिषदेच्या सभापतींना साद घातली. ‘सभापती महोदय, एक तर मी नवीन प्लेअर आहे. तरीही तुम्ही सगळे मिळून मला बाऊंन्सरवर बाऊंन्सर टाकत आहात, आता जरासं थांबा, दमानं घ्या. तुमच्या सर्व प्रश्नांवर मी सविस्तर उत्तर देईल,’ असं आवाहन मंगलप्रभात लोढा यांनी केलं.

गुरुवारी अडचणीत आलेल्या तानाजी सावंतांनी आज दिलं सविस्तर उत्तर
पालघर जिल्ह्यात एकूण आरोग्य विभागाची मंजूर आणि रिक्त, भरलेली पदे किती याची माहिती अजित पवार यांनी गुरुवारी विचारली होती. ऐनवेळी विचारलेल्या या प्रश्नामुळे मंत्री तानाजी सावंत यांची तारांबळ उडाली होती. त्यानंतर हा प्रश्न राखीव ठेवण्यात आला. याची माहिती तानाजी सावंत यांनी आज आकडेवारीसह सादर केली. ‘पालघरमध्ये ६९ मंजूर पदे, भरलेली ३८, रिक्त पदे ३१ आहेत. अतिरिक्त भार देऊन कामकाज सुरूच आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि राज्य सरकार यांच्यात ६०:४० असं खर्चाचं प्रमाण आहे, वेळेत निधी उपलब्ध करुन दिला जातोय,’ असं सावंत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button