Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

गृहिणींचे बजेट कोलमडले, श्रावण सुरू होण्याआधीच भाज्यांचे दर कडाडले; असे आहेत भाज्यांचे दर

नवी मुंबई: सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान होत असून, यामुळे मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. जो काही भाजीपाला येत आहे, त्यात पाण्याने भिजलेल्या भाजीपाल्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातून होणारी भाज्यांची मागणी पूर्ण होत नाही. परिणामी भाजीपाल्याच्या दरात वाढ होत असून, या आठवड्यात अनेक भाज्या घाऊक बाजारातच ६० ते ८० रुपये किलोच्या घरात पोहचल्या आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात एक किलो भाजीसाठी १०० ते १२० रुपये मोजावे लागत आहेत.

पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातच भाजीपाला भिजून पॅकिंग होत आहे. तिथून मुंबईच्या बाजारात आणण्यासाठी हा भाजीपाला गाडीतून आणला जातो. मुंबईतील घाऊक बाजारात माल पोहचेपर्यंत तीन ते चार तास जातात. भिजलेला असल्याने गाडीत हा माल खराब व्हायला सुरुवात होते. त्यामुळे सध्या घाऊक भाजीपाला बाजारात चांगला भाजीपाला कमी प्रमाणात दिसत आहे. पाऊस असल्याने शेतकऱ्यांना शेतात भाजीपाला काढायला, त्याची पॅकिंग करायला मजूर मिळत नाहीत. पावसात भिजत काम करायला कामगार मजूर येत नाहीत. त्यामुळे आधीच मालाची आवक कमी होत आहे, त्यातच ओला असल्याने माल खराब होण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे मोठे नुकसान होत आहे.

परिणामी एकूणच बाजारात कमी प्रमाणात भाजीपाला पाहायला मिळत आहे. यामुळे किरकोळ बाजारातून व्यापाऱ्यांची होणारी भाजीपाल्याची मागणी ही पूर्ण करता येत नसल्याचे घाऊक व्यापारी सांगत आहेत. सध्या घाऊक बाजारात ५०० ते ५५० गाड्या भाजीपाल्याची आवक होत आहे, अशी माहिती बाजारसमितीकडून देण्यात आली आहे. पूर्वी ही आवक ५५० ते ६५० इतकी होती. मात्र, ५०० ते ५५० गाड्यांमधून चांगला भाजीपाला ४०० गाड्यांइतकाच असतो. प्रत्येक गाडीतून खराब भाजीपाला बाहेर फेकून द्यावाच लागतो. त्यामुळे मागणी इतका पुरवठा होत नसल्याने बाजारात येणाऱ्या भाजीपाल्याचे दर वाढत आहेत.

यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना भाजीपाला खरेदी करताना हात आखडता घ्यावा लागत आहे. किरकोळ बाजारात भाज्या ८० ते १०० आणि १०० ते १२० रुपये किलोप्रमाणेच मिळत आहेत. त्यातही विक्रेत्यांकडे ठराविकच भाज्या पाहायला मिळत आहेत. पाऊस ओसरेपर्यंत अशीच परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

सध्याचे घाऊक दर प्रतिकिलो

भेंडी ६० ते ७५ रु किलो

फरसबी ६० ते ८० रु किलो

गवार ५० ते ८० रु किलो

घेवडा ४० ते ६०

ढोबळी मिरची ४० ते ६०

हिरवा वाटाणा ८० ते १००

वालवड ५० ते ६०

चवळी शेंग ३५ ते ५०

हिरवी मिरची ५० ते ५५ रु किलो

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button