Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

भाजप प्रवक्त्या नूपूर शर्मांवर एफआयआर दाखल, वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी रझा अकादमीची तक्रार

मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपूर शर्मा यांच्या विरोधात मुंबईत एफआयर दाखल करण्यात आला आहे. नूपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य टीव्ही वाहिनीवरील चर्चेत केलं होतं. रझा अकादमीनं देखील आक्षेप व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. शर्मा यांच्या वक्तव्यामुळं मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या, असा आरोप रझा अकादमीनं केला आहे.

नूपूर शर्मा यांनी टीव्ही डिबेटमध्ये मोहम्मद पैंगबर यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. शर्मा यांच्या वक्तव्यानं काल दिवस गदारोळ झाला होता. नॅशनल कॉन्फरन्ससह विविध मुस्लीम संघटनांकडून देखील नूपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता. रझा अकादमीनं मुंबई पोलीस आयुक्तांना नूपूर शर्मा यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पत्र दिलं होतं.

मुंबई पोलिसांनी नूपूर शर्मा यांच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नूपूर शर्मा यांच्या विरोधात कलम भादंविच्या २९५ अ, १५३अ आणि ५०५ ब अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती आहे.

एमआयएमची हैदराबादमध्ये तक्रार
नूपूर शर्मा यांच्या विरोधात हैदराबादमध्ये देखील एमआयएमनं तक्रार दाखल काले आहे. नूपूर शर्मा यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी एमआयएनं केली आहे. नूपूर शर्मा यांनी मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचं एमआयएम नेते म्हणाले.

भाजप प्रवक्त्या नूपूर शर्मा यांनी ज्ञानवापी प्रकरणी सुरु असलेल्या एका टीव्ही डिबेट शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. शनिवारी नॅशनल कॉन्फरन्स च्या नेत्यांनी नुपूर शर्मा यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. मुंबईत रझा अकादमी आणि सुन्नी बरेल्वी संघटनेकडून तक्रार करण्यात आली होती. दुसरीकडे नूपूर शर्मा यांनी मुस्लीम संघटनांकडून धमकी येत असल्याचं म्हटलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button