breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#Farmer Protest – शेतकरी आंदोलन डावे, माओवाद्यांच्या हातात; पीयुष गोयल यांचे गंभीर आरोप

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात गेल्या अडीच महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर मोदी सरकारचे बडे मंत्री पीयुष गोयल यांनी गंभीर आरोप केले आहेत. शेतकरी आंदोलन हे आता डावे आणि माओवाद्यांच्या हाती गेले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. डाव्या विचारसरणीच्या संघटना आपला अजेंडा चालवू इच्छित आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रलोभांना बळी पडू नये आणि सरकारसोबत चर्चा करावी. शेतकऱ्यांसाठी सरकारचे दरवाजे प्रत्येक मुद्द्यावर चर्चेसाठी खुले असल्याचे गोयल म्हणाले. 

काय म्हणाले गोयल

रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी एनबीटीला दिलेल्या मुलाखतीत हे आरोप केले आहेत. वामपंथी संघटना शेतकऱ्यांना भडकवत आहेत. सरकार तिन्ही कृषी कायदे मागे घेणार का, या प्रश्नावर गोयल म्हणाले की, या कायद्यांमुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. काही मोजक्या लोकांसाठी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे नुकसान करता येणार नाही. 

शेतकरी कायद्याच्या कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करू इच्छित असतील तर त्यांनी सरकारकडे यावे. सरकार यासाठी तयार आहे. जिथपर्यंत एमएसपीचा प्रश्न आहे, लोकसभेपासून सरकारपर्यंत शेतकऱ्यांना पूर्ण आश्वासन दिले आहे की एमएसपी मागे घेतला जाणार नाही. एमएसपी सुरुच राहणार आहे.

यंदा २३ टक्के जास्त शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्यात आली. मला पूर्ण विश्वास आहे की, शेतकरी देशहिताच्या या कायद्याला समजून घेतील. त्यांना या कायद्यातून सर्व प्रकारच्या बंधनांतून मुक्ती मिळणार आहे. जर त्यांना त्यांच्या उत्पादनाची किंमत अन्य ठिकाणी जास्त मिळत असेल तर ते तिथे जाऊन विक्री करू शकतात. 

वाचाः Good News: महापालिकेच्या कर्मचा-यांना मिळणार वेतन आयोगाचे फरक

शेतकरी संघटनेने (भानु) दाखल केली याचिका

शेतकरी आंदोलनाच्या १६ व्या दिवशीही कुठलाही तोडगा निघू शकला नाही. भारतीय शेतकरी संघटनेने (भानु) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करीत सरकारने लादलेले तिन्ही कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. तर उद्या शनिवारी देशभरातील टोल नाके मुक्त करण्याचा आणि दिल्ली-जयपूर व दिल्ली-आगरा महामार्ग अडविण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. तसेच दिल्ली, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानसह सर्व राज्यांत टोल नाके व रस्ते बंद करण्याचे त्यांनी ठरविले आहे. काही ठिकाणी रेल रोकोही केला जाईल, असे कळते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button