TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

एकनाथ शिंदे आणि फडणवीस म्हणजे ‘नाईट किंग’; मुख्यमंत्र्यांच्या एका वाक्याचा धागा पकडत शिवसेनेकडून टीकेची धार

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी पक्षातील आमदारांसह बंडखोरी करत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेकडून टीकेची धार दिवसागणिक टोकदार केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर विधिमंडळातील आपल्या पहिल्या भाषणातच मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर भाष्य केलं. एकनाथ शिंदे यांच्या याच भाषणातील एका वाक्याचा धागा पकडत शिवसेनेनं शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली आहे.

‘एकनाथ शिंदे यांच्या अंगास नव्याने हळद लागली आहे. त्यामुळे त्यांचे आत्मविश्वासपर बोलणे समजून घेतले पाहिजे. फडणवीस व ते कशा गुपचूप पद्धतीने भेटत होते याचे रहस्यमय किस्से शिंदे यांनी सांगितले. आमदार झोपल्यावर ते निघायचे व उठण्याआधी परत यायचे. अशा प्रकारे हे दोन ‘नाईट किंग’ काम करीत होते,’ अशा शब्दांत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून सत्ताधाऱ्यांचा समाचार घेण्यात आला आहे.

‘शिंदे-फडणवीसांची वक्तव्ये म्हणजे बाजारातील उधारीचा माल’

राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळात बोलताना एकनाथ शिंदे यांना एक इशारा दिला होता. शिवसेनेतून बंड केले आमदार पुन्हा निवडून येत नाहीत, असा इतिहास असल्याचं अजित पवार म्हणाले. त्यावर बोलताना मी आणि देवेंद्र फडणवीस पुढील निवडणुकीत २०० जागा जिंकू, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं. शिंदे यांच्या या दाव्यावर निशाणा साधताना शिवसेनेनं म्हटलं आहे की, ‘एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा आता २०० जागा निवडून आणण्याचा त्यांचा वायदा आहे. बाजारात नेहमी उधारी चालत असते. उधारी म्हणजे काय? माल आधी काही दिवस गिऱ्हाईकाने ताब्यात घ्यायचा व त्याचे पैसे दुकानदारास मागाहून द्यायचे. ती उधारी कधी कधी बुडवली जाते. शिंदे-फडणवीसांची ही वक्तव्ये म्हणजे बाजारातील ‘उधारीचा माल’ आहे. बाजारात नेहमी उधारी चालत असते. उधारी म्हणजे काय? माल आधी काही दिवस गिऱ्हाईकाने ताब्यात घ्यायचा व त्याचे पैसे दुकानदारास मागाहून द्यायचे. ती उधारी कधी कधी बुडवली जाते.’

‘मोदी आता राज्याला बुलेट ट्रेन देतील, जीएसटी देतील, पण त्याबदल्यात…’
राज्यातील सत्तानाट्यावर भाष्य करताना शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे. ‘एकनाथ शिंदे-फडणवीस यांच्या येण्याने महाराष्ट्राला सर्वकाही मिळेल. काहीच कमी पडू दिले जाणार नाही, असे पंतप्रधान मोदी सांगतात. ते बुलेट ट्रेन देतील, जीएसटीचा परतावा देतील, आरेतील जंगलतोड करू देतील, ‘ईडी’च्या चौकश्या बंद करतील. त्या बदल्यात फक्त मुंबईसह महाराष्ट्राचे तीन तुकडे शिंदे-फडणवीसांकडून करून घेतील,’ असा खळबळजनक आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button