Uncategorized
दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील राज्यपाल कक्षाचे आगीत नुकसान
![Damage to Governor's Chamber in Delhi's Maharashtra Sadan](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/mh-sadan-202107659255_202107225482.jpg)
नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आज सकाळी भीषण आग लागली होती. या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. जवानांच्या अथक प्रयत्नांनी काही वेळेतच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. मात्र आगीमुळे राज्यपाल कक्षातल्या मालमत्तेचे काही प्रमाणात नुकसान झाले. आगीमागचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन महाराष्ट्र सदनातील राज्यपालांच्या खोलीला आग लागली होती. आगीमुळे पूर्ण महाराष्ट्र सदनात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला. त्यानंतर राज्यपालांच्या खोलीच्या आसपासच्या खोल्या तात्काळ रिकाम्या करण्यात आल्या. त्यामुळे जीवितहानी टळली मात्र फर्निचरचे मोठे नुकसान झाले.