सर्दी आणि खोकल्यासारख्या त्रासांवर मात करण्यासाठी योग फायदेशीर
श्वसनावर योगाचा प्रभाव, छातीत साठलेला कफ मोकळा
महाराष्ट्र : सततच्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी खोकल्याचे प्रमाण वाढले आहे तसेच इतरही विषाणूंचा संसर्ग बऱ्याच जणांना होत आहे. अशातच योग्य आहार, व्यायाम, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे हे अत्यावश्यक झाले आहे. आणि जेव्हा हे सगळे करूनही सर्दी आणि खोकला बरा होत नाही तेव्हा आपण औषधांच्या पलीकडे काही उपाय आहे का ते शोधू लागतो. आणि इथेच योगाची प्राचीन पद्धती अस्तित्वात येते.
योग ही फक्त शारीरिक तंदुरुस्तीची पद्धती नसून, मन, शरीर आणि आत्म्याचा समतोल साधणारी एक प्राचीन पद्धती आहे. खासकरून सर्दी आणि खोकल्यासारख्या त्रासांवर मात करण्यासाठी योग फायदेशीर ठरतो. नियंत्रित श्वसन प्रक्रिया, साधी व हलकी योगासने आणि ध्यान यांचा योग्य मेळ साधल्यास श्वासोच्छवास सुधारतो, छातीत साठलेला कफ मोकळा होतो, आणि शरीराला ताजेतवाने वाटते.
श्वसनावर योगाचा प्रभाव
योगामध्ये प्राणायामाच्या मदतीने श्वसन प्रक्रिया सुधारण्यासाठी विशेष भर दिला जातो.
फुप्फुसांची क्षमता वाढते
खोलवर श्वास घेतल्यामुळे फुप्फुसांचा विस्तार होतो आणि श्वसन अधिक सुलभ होते.
ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो
धीम्या श्वसनामुळे शरीरातील पेशींना अधिक ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे ऊर्जा आणि चैतन्य वाढते.
वायुमार्ग स्वच्छ होतो
काही योगासनांमुळे छातीत साठलेला कफ मोकळा होतो आणि श्वसन मार्ग मोकळा होतो.
हळू श्वासोच्छवास करण्याचे महत्त्व
सर्दी आणि खोकल्याची लक्षणे नाहीशी करण्यात मंद गतीत श्वासोच्छवास करण्याचे व्यायाम महत्त्वाची भूमिका बजावतात. सर्दी झाली की शरीर आपोआप जलद आणि उथळ श्वास घ्यायला लागते. यामुळे खोकला वाढतो आणि छातीत जळजळ होण्याची शक्यता वाढते.
मंद गतीतील श्वासोच्छवास खालील गोष्टींचा प्रतिकार करतो
– हळूहळू, खोल श्वास घेण्यामुळे शरीर सक्रियपणे रिलॅक्स होते, ताण कमी होतो आणि शरीर पूर्णपणे बरे होण्यावर लक्ष केंद्रित करू शकते.
– हळू श्वासोच्छवासामुळे खोकल्याचा रेफ्लेक्स कमी करण्यास मदत होते, ज्यामुळे सततच्या खोकल्यापासून आराम मिळतो.
– हळूहळू श्वास घेताना खोल सगवस सोडल्याने कार्बन डायऑक्साइड आणि इतर टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते, जे शरीर संसर्गाशी लढत असताना फायदेशीर ठरते.
– हे व्यायाम मज्जासंस्थेचा समतोल राखण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीर शांत राहते आणि एकूण आरोग्य सुधारते.
सर्दी व खोकल्यावर प्रभावी योगासने
बालासन
या शांत व बैठी आसनात हलके पुढच्या बाजूला वाकायचे असते. ज्यामुळे छाती आणि नाकाचा, श्वासनाचा मार्ग मोकळा होण्यास मदत होते. डोक्याला हृदयाच्या खालच्या बाजूला रिलॅक्स होऊ द्या. यामुळे सर्दीच्या वेळी शरीराला आवश्यक असलेली विश्रांती मिळते आणि ताण कमी होतो.
सेतू बंधासन
या आसनात तुम्हाला पाटीवर झोपून कंबर वर उचलायची असते, ज्यामुळे छाती आणि फुफ्फुसे मोकळी होण्यास मदत होते. या तयार झालेल्या मोकळीकीमुळे श्वासोच्छवास चांगला होण्यास मदत होते आणि दम लागणे व श्वास घेताना होणार त्रास हे कमाई होण्यास मदत होऊ शकते. फुफ्फुसांची एकूण क्षमता आणि श्वसन कार्य वाढवण्यासाठी उभे राहून केलेले सेतू बंधासन हे एक उत्तम आसन आहे.
या आसनात तुम्ही कंबरेपासून पुढे वाकता, ज्यामुळे नाक मोकळे होते आणि सायनसचा दाब कमी होतो. उभे राहून पुढे वाकण्याचा आणखी एक फायदा म्हणजे डोके हृदयाच्या खालच्या बाजूला टेकवले जाते, त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि सर्दीमुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून आराम मिळतो.
भुजंगासन
पोटावर झोपून, हात छातीजवळ जमिनीवर तसेच ठेवून, छातीपासूनचे शरीर मागच्या बाजूला वाकवणे, यामुळे फुफ्फुसांना अराम मिळतो. तसेच खोलवर श्वास घेता येतो आणि फुफ्फुसातील कफ बाहेर टाकण्यास मदत होते. हे फुफ्फुसांची ताकद वाढवते आणि खोकल्याच्या त्रासातून आराम मिळवण्यासाठी उपयोगी ठरते.
याव्यतिरिक्त अनुलोम-विलोम आणि कपालभारतीसारखे प्राणायाम करणे सर्दी आणि खोकला कमी करण्यास फार उपयुक्त तसे प्रभावी ठरू शकते.
ही छातीतील दाब, सर्दी आणि खोकल्यासाठी साधी, हलकी आणि प्रभावी योगासने आहेत. ही योगासने आरोग्याच्या इतर फायद्यांसह सर्दी आणि खोकल्याच्या लक्षणांवर प्रभावीरीत्या काम करतात. परंतु आपल्या आराम व सोयीनुसार, कोणताही ताण न घेता आणि योग्य पद्धतीनेच या योगसनांचा सर्व करा. खास तुम्ही खूप आजारी असाल तर. तसेच या योगासनांचा सर्व करूनही जर लक्षणे कायम राहिली, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.




