आठवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार ; नराधम अखेर गजाआड
![Class VIII student raped; The killer is finally caught](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/rape-and-arrest-compressed.jpg)
नागपूर : आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर एका युवकाने बळजबरी लैंगिक अत्याचार केला. ही घटना नरखेड तालुक्यातील एका गावात उघडकीस आली. अनिल सुरेश टेकाडे (३२) असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल टेकाडे हा शेतकरी असून दारुडा आहे. त्याची वाईट नजर १४ वर्षांच्या मुलीवर होती. तो नेहमी त्या मुलीशी छेडखानी करीत होती. ती घरी आल्यानंतर तिच्याशी अश्लील चाळे करीत होता. अनेकदा मुलीच्या घरी कुणी नसताना तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.
१ जुलै रोजी दुपारी दीड वाजता शेजारी असलेल्या एका इमारतीच्या मागे नेऊन मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. केलेल्या कृत्याबाबत कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर तो शाळेच्या सुटीच्या दिवशी त्या मुलीला घरी बोलावून शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. १३ सप्टेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता अनिल टेकाडे हा त्या मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करताना गावातील एका युवकाला दिसला. त्याने मुलीच्या आईवडिलांना सांगितले. मुलीनेही घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यावरून नरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल करून अनिलला अटक केली.