breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘स्वच्छ हरित ग्राम व जल समृद्ध गाव’ कार्यशाळेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शहरात दौरा

पिंपरी : भारत सरकारच्या पंचायत राज विभागामार्फत  सूचित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ हरित ग्राम व जल समृद्ध गाव’ या विषयावर आधारित तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषद, पुणे यांच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे करण्यात आले असून या कार्यशाळेचे  उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दि. २२ सप्टेंबर २०२२ रोजी होणार आहे. 

ग्रामविकास व पंचायती राज मंत्रालय भारत सरकार आणि ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत “शाश्वत विकास ध्येयांचे स्थानिकीकरण” या विषयाच्या दृष्टिकोनावर आधारित राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन दि २२ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२२ या कालावधीमध्ये करण्यात आले आहे. 

या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या सरपंच अथवा प्रतिनिधींना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील , खासदार , आमदार, केंद्र व राज्य शासनातील विविध विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत.   या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून  सुमारे एक हजार सरपंच अथवा त्यांचे प्रतिनिधी  तसेच इतर राज्य व  केंद्र शासित प्रदेशांमधून सुमारे चारशे ते पाचशे प्रतिनिधी देखील सहभागी होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथून मिळाली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button