TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणे

चौकशीत संतोष जाधवकडून मोठा खुलासा, मूसेवाला हत्या प्रकरणाला वेगळं वळण

पुणे : मूसेवाला हत्याप्रकरणामध्ये मोठी घडामोड समोर आली आहे. मूसेवाला हत्या प्रकारणात आपला सहभाग नसल्याचं चौकशीत संतोष जाधव याने म्हटलं आहे. त्यामुळे तपास यंत्रणेसाठी हा मोठा झटका आहे. गायक सिद्धू मूसेवाला याच्यावर हल्ला करण्याकरता सचिन बिश्नोई गँगने महाराष्ट्रातून दोन शार्प शूटर बोलावले होते. त्यामधील एक आरोपी संतोष जाधव होता. पण संतोषच्या या माहितीमुळे आता तपासाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

हत्येच्या दिवशी आपण गुजरातमध्ये असल्याची माहिती संतोष जाधव याने चौकशीत सांगितल्याचं सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे संतोष जाधवच्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी पुण्याचे पथक गुजरात आणि मध्य प्रदेश येथे गेल्याची माहिती देखील समोर आली आहे. यापूर्वी देखील सौरभ महाकाळ याने मूसेवाला हत्या प्रकारणात सहभागी नसल्याचे सांगितले होते. तर दिल्ली आणि पंजाब पोलिसांनी ८ शूटर्सचे फोटो जारी केले होते आणि दावा केला होता की संतोष हा या हत्याकांडाचा मुख्य शूटर आहे.

यामुळे आता चौकशीत काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, मूसेवालांची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शूटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. ३ शूटर्स पंजाबमधील होते. २ महाराष्ट्रातले, २ हरियाणातले आणि यामधील एक शार्पशूटर हा राजस्थानमधील होता. संतोष जाधवच्या अटकेमुळे मूसेवाला प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण आता याला वेगळंच वळण लागलं आहे.

कोण आहे संतोष जाधव ?

* संतोष जाधव हा २३ वर्षांचा आहे. तो मूळचा आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पोखरी गावचा आहे. त्याचं मंचरमध्ये वास्तव्य होतं.

*त्याच्या कुटुंबात आई, बहीण, पत्नी आणि एक मुलगी आहे.

*मंचर पोलीस स्टेशन हद्दीत राण्या उर्फ ओमकार बानखीले यांचा १ ऑगस्ट २०२१ रोजी खून करण्यात आला होता. संतोष जाधव या खुनात सहभागी असल्याचा गुन्हा दाखल आहे.

*त्याशिवाय, मंचर पोलीस त्याच्यावर ठाण्यात एक खंडणीचा, चोरीचा गुन्हा देखील दाखल आहे.

*राण्या बानखीले खुनाच्या गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का देखील लावण्यात आला असून तो फरार आहे. या प्रकरणात त्याला तडीपार करण्यात आले होते.

*त्यानंतर त्याचे राजस्थान, पंजाब, हरियाणा या भागात वास्तव्य होते. येथेही त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button