breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

मोठी बातमी : ठाकरे सरकारची मोठी घोषणा; सर्वपक्षीय आमदारांना मुंबईत ३०० घरे

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सर्वपक्षीय आमदारांना मोठी भेट दिली आहे. राज्यातील ग्रामीण भागांतून मुंबईत येणाऱ्या आमदारांसाठी गोरेगावमध्ये ३०० घरे बांधण्यात येणार आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज, गुरुवारी विधानसभेत ही घोषणा केली.

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही मोठी घोषणा केली. मुंबईतील गोरेगावमध्ये ग्रामीण भागांतून येणाऱ्या आमदारांसाठी ३०० घरे बांधण्यात येणार आहेत. मुंबईत ज्या आमदारांची घरे नाहीत, जे शहरातील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत नाहीत आणि मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्राच्या बाहेरील आहेत, असे आमदार राज्य सरकारच्या या योजनेचे पात्र लाभार्थी असतील, असे त्यांनी सभागृहात सांगितले.
अनेक आमदार हे राज्याच्या ग्रामीण भागांतून मुंबईत येत असतात. ते आमदार आहेत. ते कोणत्या पक्षाचे आहेत, हे महत्वाचे नाही. पण त्यांच्यासाठी घरे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची म्हणजे राज्य सरकारची आहे, असेही आव्हाड म्हणाले.

गोरेगावमध्ये म्हाडा उभारणार कॉम्प्लेक्स

मुंबईतील गोरेगावमध्ये आमदारांसाठी घरे बांधण्यात येणार आहेत. म्हाडाकडून गोरेगावमध्ये गृहसंकुल उभारण्यात येणार आहे. उच्च उत्पन्न गटासाठी ही घरे असतील, असे आव्हाड यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सभागृहात याबाबत माहिती दिली. ३०० आमदारांसाठी राज्य सरकार मुंबईत घरे बांधणार असल्याचे ठाकरे म्हणाले. सर्वपक्षीय आमदारांना कायमस्वरूपी घरे देत आहोत, त्याचाही आनंद आहे, असेही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button