breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेश

गुजरात निवडणुकीची रणसंग्राम : पिता-पुत्र आमने सामने; एकाच जागेवरुन दोघेही रिंगणात

सूरत । महाईन्यूज । वृत्तसंस्था ।

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांसह प्रादेशिक पक्ष तयारीला लागले आहेत. भाजप, काँग्रेस आणि आप यांच्यात प्रमुख लढत आहे. प्रादेशिक पक्ष भारतीय ट्रायबल पक्ष देखील गुजरातमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. राज्यातील आदिवासी बहूल भागात या पक्षाची मतं निर्णायक आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत बीटीपीनं काँग्रेससोबत निवडणूक लढवली होती. यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रमुख नेते छोटूभाई वसावा आणि त्यांचा मुलगा महेश वसावा यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. महेश वसावा यांनी नर्मदा जिल्ह्यातील झगडिया विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. आज छोटूभाई वसावा यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

त्यामुळं सत्तासंघर्षात गुजरातमध्ये पिता-पुत्र आमने सामने आल्याचं दिसून आलं आहे. भारतीय ट्रायबल पार्टीचे संस्थापक आणि आमदार छोटूभाई वसावा यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी झगडिया विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. काल छोटूभाई वसावा यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचं ट्विटरवरुन जाहीर केलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button