आशिया चषक 2022 : पाकिस्तान विरुद्धचा अंतिम सामना विजयानंतर श्रीलंकेच्या संघावर भरघोस पैशांचा पाऊस
नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात आशिया चषक 2022चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने 23 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. श्रीलंकेच्या 170 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाचा डाव श्रीलंकेच्या गोलंदाजांनी 147 धावांवर गुंडाळला.
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात आशिया चषक 2022 चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने 23 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. श्रीलंकेच्या 170 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाचा डाव श्रीलंकेच्या गोलंदाजांनी 147 धावांवर गुंडाळला. मात्र, या सामन्यानंतर श्रीलंकेच्या संघाला मोठी बक्षीस रक्कम मिळाली आहेत. ‘प्लेअर ऑफ द मॅच’ आणि ‘प्लेअर ऑफ द सिरीज’सह अनेक खेळाडूंना बक्षीस मिळाले आहेत. याविजयासह श्रीलंकेने आशिया कपवर सहाव्यांदा नाव कोरले आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी 1.5 लाख डॉलर्सचा धनादेश कर्णधार दासुन शनाकाकडे सुपूर्द केला. श्रीलंकेने फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर संघाला 1.5 लाख डॉलरचा चेक देण्यात आला. भारतीय रुपयानुसार 1.2 कोटी इतकी रक्कम आहे. वानिंदू हसरंगा याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून गौरविण्यात आले आहे. त्याला 15 हजार डॉलरचा धनादेश देण्यात आला. भारतीय रुपयानुसार हे सुमारे 12 लाख रुपये आहे. भानुका राजपक्षेला अंतिम सामन्यासाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरविण्यात आले. राजपक्षे यांना 5 हजार डॉलर्सचा धनादेश देण्यात आला. सामन्यातील सर्वोत्तम कॅचसाठी 3 हजार डॉलर्सचा धनादेश देण्यात आला. पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर राहिला. पाकला बक्षीस म्हणून 75 हजार डॉलर (सुमारे 60 लाख रुपये) देण्यात आले आहे.