भरधाव ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू
![A truck and a tractor collided head-on, killing four people on the spot](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/भरधाव-ट्रक-आणि-ट्रॅक्टरचा-भीषण-अपघात-गाडीखाली-चिरडल्याने-चार-जणांचा.jpg)
गोंदिया : राज्यात अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना गोंदियांमध्ये आणखी एक भीषण अपघाताची नोंद करण्यात आली आहे. गोंदिया-धापेवाडा -तिरोडा राज्यमार्गावर दवनीवाडा पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या महालगाव/मुरदाडा गावाजवळ आज १५ जून रोजी ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १०.३० च्या सुमारास झालेल्या ट्रक आणि ट्रॅक्टरच्या भीषण अपघात चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली. संतप्त नागरिकांनी ट्रकला आग लावली आहे. यामुळे कामाच्या वेळी मोठी वाहतूक कोंडीही झाल्याचं पाहायला मिळालं.
पोलीस सुत्राकंडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकने विरुध्द दिशेने येत असलेल्या ट्रॅक्टरला धडक दिली. यात ट्रॅक्टर ट्रकच्या खाली आल्याने ड्रायव्हरसह चार हमालांचा या अपघातात मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर चार मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून त्यांना शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, यामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.