Uncategorizedताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

अनाथ मुलांच्या संस्थेस तब्बल पन्नास लाखाची देणगी देत एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला

कोल्हापूर: ज्या समाजाने भरभरून दिले, त्या समाजाप्रती आपलीही काही जबाबदारी असते, ही माणुसकीची भावना आज समाजात कमी होत असताना नामांकित वकील अभय नेवगी यांनी कोल्हापुरातील बालकल्याण संकुल या अनाथ मुलांच्या संस्थेस तब्बल पन्नास लाखाची देणगी देत एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. किमान चार कोटीची जागा एका मुकबधीर शाळेला देणाऱ्या नेवगींनी आता संवेदनशीलतेची नवी पाऊलवाट तयार करून दिली आहे. ज्या वाटेवर अनेकांनी चालल्यास अनेक सामाजिक संस्थांना मोठे बळ मिळणार आहे.

कोल्हापुरात बालकल्याण संकुल नावाची सामाजिक संस्था आहे. यामध्ये अनाथ मुलांसह निराधार महिलांचा समावेश आहे. मुलांची आणि महिलांची वाढती संख्या आणि कमी पडणारी अपुरी जागा या पार्श्वभूमीवर सरकारने संस्थेला दहा गुंटे जमीन दिली. पण त्यावर महिला वसतीगृहाची इमारत बांधण्यास किमान अडीच कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी दिलेल्या देणगीतून आणि मदतीतून बांधकाम सध्या सुरू आहे. पण केवळ पैसे नसल्याने बांधकामाला गती येत नसल्याचे अॅड. नेवगी यांना कळाल्यानंतर त्यांनी तातडीने पन्नास लाखाची मदत करण्याचा निर्णय घेतला. ही रक्कम ते शनिवारी संस्थेला देणार आहेत. दिवंगत आईची आठवण म्हणून ते हा निधी देणार आहेत.

नेवगी हे उच्च व सर्वेाच्च न्यायालयात वकिल आहेत. ते ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे व नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या खटल्यात न्यायालयात त्यांच्या कुटुंबियांची बाजू मांडत आहेत. त्यांचे वडिल एस. व्ही. नेवगी हे जिल्हा न्यायाधिश होते. तेव्हापासून नेवगी कुटुंबियांचा बालकल्याण संस्थेशी ऋणानुबंध आहे. यापूर्वी त्यांनी कोल्हापुरातील त्यांची मालमत्ता रोटरी मुकबधीर विद्यालयास दिली होती. याची बाजारभावाने चार कोटीची किंमत होते. समाजात श्रीमंती भरपूर आहे, पण अनेक ठिकाणी दानत कमी आहे. अशा समाजात नेवगी यांनी निराधारांच्या संस्थांना मदतीचा हात देत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button