२०२४ च्या लोकसभेत भाजपाला ४०० हून अधिक जागा मिळतील; ‘या’ नेत्याचे भाकित
![BJP will get more than 400 seats in coming loksabha election says this leader](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/bjp-pti-1540052550-0-0-2-0-1559751056.jpeg)
राज्यात महापालिका निवडणूकीचे वारे वाहू लागले असताना भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ४०० हून अधिक जागा मिळतील, असे विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवत देशाची एकहाती सत्ता मिळवली होती. दरम्यानच्या काळात भाजपाचा देशातील अनेक राज्यांमध्ये मोठा विस्तार झाला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. हे निर्णय पाहता २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला ४०० हून अधिक जागा मिळतील. तर काँग्रेसचे बसमध्ये बसवून नेता येतील एवढेच खासदार निवडून येतील, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.