Uncategorizedताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

हैदराबाद, महाराष्ट्र, बिहारनंतर गुजरातमध्ये एमआयएमची एन्ट्री

एमआयएम भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये राजकीय एन्ट्री करणार आहे. हैदराबाद, महाराष्ट्र, बिहारनंतर गुजरातमध्ये एमआयएम भाजपला टक्कर देणार आहे. भारतीय ट्रायबल पार्टी सोबत युती करून नगरपालिका निवडणूका एमआयएम लढवणार असल्याची माहिती खासदार तसेच एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

गुजरातमध्ये छोटू भाई वसावा यांची भारतीय ट्रायबल पार्टी आहे. त्या पार्टीसोबत आम्ही युती करणार आहोत. त्यांचा खूप प्रभाव आहे. तिथं त्यांचे तीन आमदार आहेत. ओवेसी साहेबांबरोबर बोलणी झाली आहे. तिथं आम्ही दोघे अलायन्स करून गुजरातमध्ये लोकल इलेक्शन लढणार आहोत, असं जलील म्हणाले आहेत.

ते म्हणाले की, नगर पालिका निवडणुकांसह स्थानिक निवडणुकांमध्ये आम्ही सोबत लढणार आहोत. यासाठी आम्ही गुजरातला जाणार आहोत. एक जानेवारीला बडोद्याला , तीन जानेवारीला सुरतला जाणार आहे. गुजरात म्हणजे यांची जागीर आहे, इथे कोणी येऊ शकत नाही, जिंकू शकत नाही असा भाजपचा समज आहे. आम्ही तिथे जात आहोत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button