सुष्मिता सेनला हवा आहे ‘मैं हूं ना’चा सिक्वेल, म्हणाली- मला पुन्हा मेजर रामची मिस चांदनी व्हायचं आहे
‘ताली’ या वेब सीरिजमुळे चर्चेत असलेल्या सुष्मिता सेनने ‘मै हूं ना’च्या सिक्वेलमध्ये मेजर रामच्या विरुद्ध मिस चांदनीची भूमिका साकारायला आवडेल, असे म्हटले आहे. 2004 मध्ये आलेल्या मैं हूं ना या चित्रपटात शाहरुख खानने मेजर रामची भूमिका केली होती, तर सुष्मिता सेनने टीचर चांदनीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सुष्मिताची भूमिका खूपच छोटी होती, पण तिची शाहरुखसोबतची जोडी खूप आवडली होती.
सुष्मिता सेनने ‘इंडिया टुडे’शी संवाद साधताना ‘मैं हूं ना’च्या सिक्वेलबद्दल सांगितले. आता त्याचा सीक्वल व्हायला हवा, असे अभिनेत्री म्हणाली. सुष्मिताने हे देखील सांगितले होते की फराहने मैं हूं ना चे अंतिम संपादन पाहिल्यानंतर आपली माफी कशी मागितली होती, कारण ती चित्रपटात कमीच दिसली होती.
‘मैं हूं ना’च्या सिक्वेलवर सुष्मिता बोलली
सुष्मिता सेन म्हणाली, ‘मला वाटते की ‘मैं हूं ना 2’ बनवण्याची वेळ आली आहे. आपण खरोखर एक सिक्वेल बनवला पाहिजे. मैं हूं ना या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी याचिका सुरू करावी, असे सांगितल्यावर सुष्मिताने फराह खान आणि शाहरुख खानच्या कोर्टात चेंडू टाकला.