‘सुपर मार्केट’मधून 15 किलो गांजा जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
![Five lakh cannabis brought for sale from town caught in Tathwade](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/11-kg-ganja-found-with-ganja-smuggler-.jpg)
बावधन येथील एका सुपर मार्केट दुकानातून आणि व्यापा-याच्या घरातून तब्बल 15 किलो 809 ग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 4) दुपारी साडेतीन वाजता केली.
प्रेमसिंग रतनसिंग चंपावत (वय 38, रा. पाटीलनगर, बावधन. मूळ रा. राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक संतोष भालेराव यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी चंपावत याचे बावधन मधील पाटील नगर येथे हिराई निवास बिल्डिंगमध्ये वेलकम सुपर मार्केट नावाचे दुकान आहे. त्याने दुकानात गांजा ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी आरोपी चंपावत याच्या दुकानात आणि घरात छापा मारून 15 किलो 809 ग्रॅम वजनाचा गांजा तसेच मोबाईल फोन, वजनकाटा, प्लास्टिक पिशव्या, गोगो गांजा भरून ओढण्याच्या उपयोगाचे साधन, रोख रक्कम असा एकूण 4 लाख 58 हजार 915 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.