सर्व्हिसिंग करताना प्रेस मशीनचे चाक अंगावर पडले अन्…
![man died in chikhali due to press machine](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/death-1-.jpg)
प्रेस मशीनची सर्व्हिसिंग करत असलेल्या कामगाराच्या अंगावर प्रेस मशीनचे चाक पडले. त्यात कामगाराचा चेंदामेंदा झाल्याने मृत्यू झाल्याची घटना 5 डिसेंबर रोजी रात्री घडली. याबाबत 31 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश गंगाराम कोरी (वय 30, रा. कुदळवाडी, चिखली) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत मुकेश गंगाराम कोरी (वय 20, रा. कुदळवाडी, चिखली. मूळ रा. नेपाळ) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सतीश चिंतामण भेंडे (रा. पूर्णानगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राजेश कोरी यांनी प्रेस मशीनच्या सर्व्हिसिंगचे कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण घेतलेले नव्हते. ही बाब माहिती असूनही आरोपीने त्यांना प्रेस मशीनची सर्व्हिसिंग करायला लावले. सर्व्हिसिंग करत असताना मशीनचे चाक राजेश यांच्या अंगावर पडले. त्यात राजेश यांच्या डोके आणि तोंडाचा चेंदामेंदा झाला. पाय तुटला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.