breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदेश-विदेशपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून का गेला? पंतप्रधान मोदींनी एकनाथ शिंदेंना सांगितलं नेमकं कारण

  • मी पंतप्रधान मोदी यांना सांगितले की, महाराष्ट्रात मोठे उद्योग आले पाहिजेत
  • महाराष्ट्रात ती गुणवत्ता आणि पायाभूत सुविधा आहेत
  • पंतप्रधान मोदी यांनी मला आश्वस्त केले

मुंबई । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

राज्यात तब्बल दीड लाख कोटींची गुंतवणूक आणू शकणारा Vedanta Foxconn हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांकडून बुधवारी न्हावा-शेवा प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आगामी काळात फॉक्सकन कंपनी महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करेल, असा दावा केला. या कंपनीकडून नुकतंच एक ट्विट करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात आगामी काळात आयफोन आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रसामुग्रीचे हब उभारले जाईल. या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होईल. याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

तसेच Vedanta Foxconn हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये का गेला, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या संवादाचा तपशीलही एकनाथ शिंदे यांनी सांगितला. मी पंतप्रधान मोदी यांना सांगितले की, महाराष्ट्रात मोठे उद्योग आले पाहिजेत. महाराष्ट्रात ती गुणवत्ता आणि पायाभूत सुविधा आहेत. आम्ही त्यासाठी उद्योगांना आवश्यक त्या सवलती द्यायला तयार आहोत, असे मी पंतप्रधान मोदी यांना सांगितले. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी मला आश्वस्त केले. Vedant Foxconn प्रकल्पाबाबत त्यांनी म्हटले की, ‘ त्यांची (कंपनीची) मानसिकताच थोडी बदलली असेल कारण त्यांना वाटले असेल आपल्याला महाराष्ट्रात सपोर्ट मिळणार नाही. महाराष्ट्रात सरकार बदलेल, हे त्यांना कुठे माहिती असेल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मात्र, आगामी काळात महाराष्ट्रात यापेक्षा मोठे प्रकल्प आणण्यासाठी केंद्र सरकार मदत करेल, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने १.५४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि जवळपास दीड लाख नोकऱ्या महाराष्ट्राने गमावल्या आहेत. विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी रात्री फोन केला होता. यावेळी त्यांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला होता. ‘वेदांता’ ग्रुप आणि तैवॉन येथील फॉक्सकॉन या कंपनीचे ६०:४० असे जॉईन्ट व्हेंचर असणारा सेमीकंडक्टर आणि डिस्पले फॅब्रिकेशनचा हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. हा प्रकल्प आता गुजरातमध्ये उभारण्यात येईल. यासंदर्भातील करारावर मंगळवारी गुजरात सरकारतर्फे गुजरात सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे सचिव विजय नेहरा यांनी स्वाक्षरी केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button